vedant bandgar murdae : निलेश गडदेच्या आवळल्या मुसक्या : हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या खूनातील मुख्य सुत्रधार नीलेश विठोबा गडदे (मूळ रा. हमालवाडी, सध्या रा. कुंभारी, ता. जत) याच्या पोलिसांनी आज मुसक्या आवळल्या. कर्नाटक सीमा भागात मैत्रिणीसोबत एका ठिकणी असताना तो सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्यातील अन्य तिघांचा शोध सुरू आहे. यापुर्वी अटकेत असलेला अतुल वायदंडे हा पोलिस कोठडीत आहे.
vedant bandgar murdae : निलेश गडदेच्या आवळल्या मुसक्या
मैत्रिणीसोबत फिरताना सापडला ; कर्नाटक सीमा भागात एलसीबीची कारवाई.
मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे या दोन गटांत वाद होता. या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित नीलेश गडदे दबाव आणला होता. बुधवारी रात्री सातच्या सुमारास दोन साथीदारांसह गडदे खरात यांच्या घरात गेला. खरात घरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावले. खंडणीही मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले.
गडदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमा झाले होते. पोलिस ठाण्याच्या परिसरात दोन गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. तेव्हा संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्यामुळे गडदे चिडला होता. त्याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला नातू वेदांतवर गोळी झाडली.
त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद आहे. संशयित वायदंडे याच्या शोधासाठी पाच पथके रवाना झाली होती. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर कर्नाटक सीमा भागातील एका लॉजवर तो असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार छापेमारी करत त्याला ताब्यात घेण्यात आले.
आज रात्री उशीरा त्याला सांगलीत आणण्यात आले होते. दरम्यान, क्रूर कृत्य करून कोणताही पश्चाताप त्याच्याजवळ नव्हता. मैत्रिणीसोबत तो लॉजवर आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उद्या (ता. 15) त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
‘एन्काउंटर’ची फक्त चर्चाच !
निलेश गडदे हा कुख्यात गुंड आहे. यापुर्वी त्याने कामागार नेते दत्ता पाटोळे यांचा खून केला होता. वेदांत बंडगर याच्या डोळ्यात गोळी मारताना त्याची क्रूरता दिसून आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे त्याच्या शोधात गेलेल्या पथकाला तो सहजासहजी हाताला लागेल, अशी खात्री नव्हती. वेळ पडली, तर गडदेच्या गोळीला गोळीने उत्तर देण्याची तयारी पोलिसांनी ठेवली होती.
यामुळेच गडदेचा ‘एन्काउंटर’ होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतू गडदे विनासायास पोलिसांच्या सापळ्यात अडकला. त्याचा जीव वाचला, आता कायदा त्याला काय शिक्षा देतो याकडे पीडित कुटुंबासह संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष असेल.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










