jat news : जत तालुक्यात ससा पकडण्यासाठी कुत्र्यांच्या शर्यती

SHARE:

jat news : जत तालुक्यात ससा पकडण्यासाठी कुत्र्यांच्या शर्यती : जत तालुक्यातील असंगी तुर्क- (मोटेवाडी) परिसरातील माळरानावर ससा या वन्यप्राण्याची कुत्र्यांच्या सहाय्याने शिकार करण्याचा प्रयत्न वनविभागाने हाणून पाडला. श्वानशर्यतीच्या माध्यमातून ससा पकडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रकरणी वनविभागाने छापा टाकून सहाजणांना ताब्यात घेतले असून तीन दुचाकी व एक अल्टो कार असा मुद्देमाल जप्त केला आहे.

jat news : जत तालुक्यात ससा पकडण्यासाठी कुत्र्यांच्या शर्यती

वनविभागाचा छापा; सहाजण ताब्यात ; विजेत्या जोडीसाठी 51 हजारांचे रोख बक्षीस, चांदीची गदा जाहीर; तीन दुचाकी व अल्टो कार जप्त

jat news : जत तालुक्यात ससा पकडण्यासाठी कुत्र्यांच्या शर्यती : वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार, ‘श्वान शर्यत 2026’ या व्हॉट्सप समूहाच्या माध्यमातून ससा पकडण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम ससा पकडणार्‍या कुत्र्यांच्या जोडीस 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस व चांदीची गदा शिल्ड देण्याची घोषणा करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन राहुल पवार (वाळेखिंडी), युवराज झांबरे (डोंगरसोनी), अजित शेट नाईक (खलाटी) आणि सचिन निकम (डोंगरसोनी) यांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली जत वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाड टाकून स्पर्धेत सहभागी व आयोजकांची धरपकड केली. यामध्ये युवराज झांबरे, गुलाब झांबरे, ओंकार सूर्यवंशी (सर्व रा. डोंगरसोनी), हणमंत जाधव (रा. टक्कलगी, कर्नाटक), राहुल पवार (रा. वाळेखिंडी) व किरण शिंदे (रा. तीप्पेहळ्ळी) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्या ताब्यातील तीन दुचाकी आणि एक अल्टो कार जप्त करण्यात आली आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत ससा हा अनुसूची-2 मधील संरक्षित वन्यप्राणी असून त्याची शिकार करणे अथवा त्यास इजा पोहोचविणे हा गुन्हा आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे

.सांगली वनविभागाचे उपवनसंरक्षक सागर गवते व सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी निखिल पाटील, वनपरिमंडळ अधिकारी गणेश दुधाळ, वनरक्षक भैरवनाथ यादव तसेच वनमजूर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *