kolhapur news : कोल्हापूर उबाठाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा;

SHARE:

kolhapur news : कोल्हापूर उबाठाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; : कोल्हापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांनी आपल्या पदाचा तडखापडकी राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षीच त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती, मात्र एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजीनाम्याचे मुख्य कारण पक्षातील दोन गटांतील सातत्याने होणारा वाद आणि तक्रारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

kolhapur news : कोल्हापूर उबाठाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा;

एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?’ कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच

इंगवले यांनी आक्षेप घेतला आहे की, त्यांना पक्षात कोणाचीही मदत मिळत नाही आणि आपण एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पक्षात समन्वयाचा मोठा अभाव

दुसरीकडे पक्षात संजय पवार, विजय देवणे आणि रविकरण इंगवले यांसारखे ताकदीचे नेते असूनही त्यांच्यामध्ये समन्वयाचा मोठा अभाव असल्याचे दिसून आलं आहे. या नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे पक्षाची एकूण ताकद कमी होत आहे. पक्षाला कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत फारसे यश मिळालेलं नाही. महापालिकेत त्यांचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. दुर्दैव म्हणजे या कमकुवत स्थितीनंतरही पक्षातील गटबाजी संपलेली नाही.

कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे शहर प्रमुख मंजित माने यांच्यासोबतची त्यांची कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. इंगवले यांनी आपला राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवला असून, आता नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मी तुझा कामगार नाही, माझ्याकडून वाचणार नाहीस

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर शहरप्रमुख मंजित माने यांना तू उद्या सकाळी उजडून दाखव, अशी फोनवरून धमकी दिली. तुझ्या अरूण दुधवडकर यांना फोन सांग, असा इशाराही दिला. दोघांत संभाषण झालेली खळबळजनक ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, ठाकरे सेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

इंगवले यांनी माने यांना फोन करून सुनील जोशींना तुम्ही इंगवलेंची माणसं असं का म्हणता? अशी विचारणा केली. त्यावर माने यांनी मी तसे म्हटले नसल्याचे सांगून त्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेण्यास सांगितले. त्यावर इंगवले, मी तुझा कामगार नाही असे म्हटले. तसेच तुझ्या दारात पाच मिनिटांत येतो, असे आव्हान दिले. त्यावर माने यांनीही या मी बाहेर आहे, दहा मिनिटांत पोहोचतो, असे प्रतिआव्हान दिले. इंगवले यांनी, तू बालगोपाल, खंडोबा तालमीकडून वाचलास, माझ्याकडून वाचणार नाहीस, अशी धमकी मानेंना दिली. त्यावर मानेंनी इंगवले यांना वाचायचा संबंधच नाही, असे सुनावले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *