miraj panchyat news :सर्वसामान्यांच्या पैशातून इमारत उभी, कोणाच्या बापाचा पैसा नाही : खा विशाल पाटील

SHARE:

miraj panchyat news :सर्वसामान्यांच्या पैशातून इमारत उभी, कोणाच्या बापाचा पैसा नाही : खा विशाल पाटीलमिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा खा. विशाल पाटील, आ.जयंत पाटील, शालिवाहन शिंदे, आ. इद्रीस नायकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेना नेते मोहन वनखंडे, सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती सौ. ललिता शेजुळ जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, तसेच सत्ताधारी सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत कापून झाले. :

miraj panchyat news :सर्वसामान्यांच्या पैशातून इमारत उभी, कोणाच्या बापाचा पैसा नाही : खा विशाल पाटील

मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे सत्ताधार्‍यांकडून उद्घाटन

यावेळी खा. विशाल पाटील म्हणाले, पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन खर्या अर्थाने झाले आहे. ही प्रशासकीय इमारत ही नागरीकांच्या पैशातून उभी राहिली आहे. कोणाच्या बापाचा पैसा नाही. हे सभागृह सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी आहे. शासनाच्या लोकांच्या लोकांना एक सवय लागली आहे. शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही. हा आपल्या वैयक्तीक बापाचा असल्या सारखा यांच्या मानत आहे. जनतेच्या पैशाच्या निर्माण झाले आहेत. मिरज पंचायत समिती सर्वात मोठी आहे. या कामासाठी काँग्रेसचे सरकार असतानाही मान्यता दिली आहे.

ज्या ज्या ठिकाणी कोणाची सत्ता येथील येथील कार्यक्रमास विरोधकांना बोलवण्याची प्रथा आहे. पण या जिल्ह्यात अनेक ठिकाणी पालकमंत्री आणि तेथील स्थानिक आमदारांना बोलावून कार्यक्रम घेतात. जनतेचा शासनाचा पैसा आम्हीच तुम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्हीच तुमचं काम करू असा भावना निर्माण करण्याचा हा उद्योग सुरू आहे. मोट बांधली नसल्यामुळे काही लोकांना याचा फायदा झाला. आता हे चालून देणार नाही. आपण खूप काहीतरी मोठ आहे अशी या मतदार संघात देत असतील ते पूर्णपणे चुकीचे आहे.

खा. विशाल पाटील म्हणाले, आम्ही संघी दिली एकत्रीत कार्यक्रम घ्यायचा आहे. लोकांची अडचणी होते परंतु काहींनी दमबाजी सुरू आहे. काही अधिकार्यांना वाटतंय या सत्तेचे संरक्षण आहे. परंतु त्यांनी लक्षात घ्यावा आज कोणाचे तरी ऐकून तुम्ही रेटून काही निर्णय घेत आहात. सत्ता ही कोणाचीही कायम नसते. अधिकारी म्हणून काम करीत असताना गेले तीन वर्षात प्रशासकीय काळात काय काय भानगडी केल्या, काय काय रामाचा राज्य केला ही सगळी चौकशी बाहेर निघणार आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनामार्फत भ्रष्टाचार झाला आहे. ही इमारत मंत्र्यांसाठी बांधली नाही. सामान्य लोकांच्या सेवेसाठी बांधली आहे. या सभागृहातून चांगले निर्णय घेतले जावेत असेही खा. विशाल पाटील म्हणाले.

आ. जयंत पाटील म्हणाले, चांगली इमारत पंचायत समिती आवारात उभी राहिली आहे. अतिशय चांगली इमारत उभी राहिली आहे. या सभागृहाचे लोकार्पण झाल्याचे जाहीर करतो. लोकांच्या समस्या अडचणी सोडविण्यासाठी या सभागृहाचा उपयोग होईल. कोणी कितीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करत असतील पण आपल्या सोबत सर्वसामान्य जनता आहे. असेही आ.जयंत पाटील म्हणाले.

माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन जनतेने हातात घेवून पूर्ण केले. लोकशाही विकृत होण्याच्या मार्गावर दिसू लागली. जनतेला दोन पाऊले पुढे येवून हा कार्यक्रम करावा लागला. जनतेचा मर्जी प्रमाणे हा कार्यक्रम पार पडला. लोकशाही जागृत आहे हे संधी सोडली नाही. हा मॅसेजे दिल्लीपर्यत जावा. फक्त रगडण्याचा प्रयत्न झाला. जनता गप्प बसणार नाही. लोकशाही मार्गानी या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले. पुढील काळात लोकहिताची आणि प्रगतीची कामे या ठिकाणाहून होणार आहे.

अजितराव घोरपडे म्हणाले, उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने काय काय राजकारण झाले. सर्व जनतेला माहित आहे. अशा पध्दतीने राजकारण करीत आहेत. देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याने पक्षाने आता तरी निट वागावं. मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं कोणाच्या स्वार्थासाठी होत असेल तर सावध रहावं.

लोकशाही जागृत असल्याचे लक्षण आहे. एका तासाच लोकार्पण कार्यक्रमाचा निर्णय झाला. त्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला हे लोकशाही बळकटीचे लक्षण असल्याचे अजितराव घोरपडे म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *