vita news : पत्नीची पेटवून हत्या; पतीस फाशीची शिक्षा विटा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

SHARE:

vita news : पत्नीची पेटवून हत्या; पतीस फाशीची शिक्षा विटा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून, नंतर तिचा गळा चिरून हत्त्या करणार्‍या पतीला विटा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. विटा येथे सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून हा पहिलाच ऐतिहासिक निर्णय आहे. रामचंद्र आनंदा कदम (वय 41) वर्ष रा. भूड, ता. खानापूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मरेपर्यंत फाशीची शिक्षा व एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद व दंडाची रक्कम मयतीच्या मुलांना देण्यात यावी असा निकाल दिला आहे.

vita news : पत्नीची पेटवून हत्या; पतीस फाशीची शिक्षा विटा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

विटा येथे सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून प्रथमच ऐतिहासिक निकाल लागला आहे. विटा येथील मे. जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रविकिरण रामकृष्ण भागवत यांच्यासमोर केस नंबर 229/ 2024 नुसार लागला आहे.

या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, आरोपी रामचंद्र पत्नी दिपालीबरोबर वारंवार वाद करून पैशाची मागणी करत होता व तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला मारहाण करत होता. त्यांच्यातील भांडणे आरोपीची आई वरचेवर सोडवत होती. आरोपी हा मुलांच्या समोरही मयत दिपाली यास शिवीगाळ व मारहाण करीत होता. दिनांक 7 जून 2021 रोजी पहाटे 3 वाजून 45 मिनिटाच्या सुमारास दिपालीच्या ओरडण्याचा आवाज आरोपीची आई व मुलांनी ऐकला व त्यांनी पाहिले असता आरोपीने मयत दिपाली हिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवले होते व उर्वरित पेट्रोल मयताच्या अंगावर ओतत होता.

आरोपीच्या आईने व मुलीने मयताच्या अंगावर पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यातून जिवंत राहील या उद्देशाने त्याने परत सुरीने तिचा गळा चिरला. दिपाली हिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

7 जून 2021 रोजी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जे. ए. जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन सगळे साहित्य जप्त केले. आरोपीची आई व मुलगी यांनी सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. 8 जून 2021 रोजी जखमी दिपाली यांनी जबाब देऊन संपूर्ण घटनाक्रम सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासी अधिकारी यांना सांगितला. 11 जून 2021 रोजी मयत झाल्या. यानंतर आरोपीला दिनांक 17 जून 2021 रोजी अटक करण्यात आली. याकामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. आरती आनंद देशपांडे (साटविलकर) यांनी काम पाहिले. या संपूर्ण प्रकरणात 11 साक्षीदार तपासण्यात आले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *