एसआयआरच्या छाननीचा सर्वाधिक फटका सांगली विधानसभा मतदारसंघाला बसताना दिसत आहे. तब्बल 90 हजार 669 मतदारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
2024 च्या निवडणुकीत सांगलीत भाजपचे सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष जयश्रीताई पाटील यांच्यात तिरंगी सामना रंगला होता. या लढतीत सुधीर गाडगीळ यांनी 36 हजार 135 मतांनी विजय मिळवला.
मात्र आता एसआयआरच्या आकड्यांनी या विजयाच्या गणितालाच नवा प्रश्न विचारला आहे.
कारण गाडगीळांचे मताधिक्य 36 हजार 135 असताना संभाव्यतः कमी होणार्या मतदारांची संख्या तब्बल 90 हजार 669 आहे.
म्हणजेच निवडणुकीतील मताधिक्याच्या कितीतरी पटीने मोठी मतदारसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकीय मैदानात आगामी काळात नवी समीकरणे आकाराला येणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










