gokul election news : कोल्हापूरच्या ’गोकुळ’ची निवडणूक जाहीर! : पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ’गोकुळ’ च्या पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण 25 संचालक पदांसाठी ही निवडणूक पार पडणार असून, 18 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान तर 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत 5,331 मतदार (प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी) आपला मताधिकार बजावणार आहेत
gokul election news : कोल्हापूरच्या ’गोकुळ’ची निवडणूक जाहीर!
18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल; सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना
’गोकुळ’ निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती: 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2026
अर्जांची छाननी: 23 सप्टेंबर 2026
वैध अर्जांची यादी: 24 सप्टेंबर 2026
अर्ज माघारीची मुदत: 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2026
अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप: 8 ऑक्टोबर 2026 (माघारीच्या अंतिम दिवशी)
मतदान: 18 ऑक्टोबर 2026
मतमोजणी व निकाल: 19 ऑक्टोबर 2026
सतेज पाटील विरुद्ध महायुती असा हाय व्होल्टेज सामना
गेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व विरोधकांना एकत्र आणून महादेवराव महाडिक यांची अनेक वर्षांची एकछत्री सत्ता उलथवून लावली होती. मात्र, गेल्या 5 वर्षांत राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे गोकुळमधील राजकीय समीकरणेही पूर्णपणे बदलली आहेत.
गेल्या निवडणुकीत सतेज पाटलांसोबत असलेले मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर हे नेते आता महायुतीत आहेत. भाजप खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची मोठी फौज एकत्र आली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळवर 25-0 असा विजय मिळवण्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे, सतेज पाटील यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भूमिका घेणार्या स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे.
गेल्या निवडणुकीत बाजी मारलेला सतेज पाटील गट आपली सत्ता कायम ठेवणार की महायुती गोकुळवर आपला झेंडा फडकवणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











