राजू शेट्टींचा राज्य सरकारला थेट इशारा!
raju shetti news : ऑक्टोबरमध्ये ऊस गळीत हंगाम सुरू करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध : राज्य सरकार यंदाचा ऊस गळीत हंगाम हा ऑक्टोबर महिन्यातील दुसर्या आठवड्यापासून सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकर्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसू शकतो. यंदा गळीत हंगाम लवकर सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला असून माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकर्यांना विचारात घेतल्याशिवाय हंगाम चालू करू नये असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
raju shetti news : ऑक्टोबरमध्ये ऊस गळीत हंगाम सुरू करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध
साखर कारखाने लवकर सुरू करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असेल. शेतकर्यांना विश्वासात घेतल्याशिवाय उसाचा हंगाम सुरू करू देणार नाही. साखर कारखाने लवकर सुरू केल्यास उतार्यामध्ये एक ते दीड टक्क्याचा फरक पडू शकतो. त्यामुळे शेतकर्याचे प्रति टन 600 रुपये नुकसान होणार आहे.
शेतकर्यांचे होणारे नुकसान सरकार भरून देणार आहे का? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. लवकर साखर कारखाने सुरू केल्याने देशातील 30 ते 35 लाख टन साखर कमी उत्पादीत होईल. यंदा देशामध्ये 338 लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे, असेही शेट्टी म्हणाले.
दिवाळी सणामध्ये साखरेचा तुटवडा निर्माण होईल या भीतीने सरकार यंदा उसाचा गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मंत्री समितीची उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये उसाचा गळीत हंगाम कधी सुरू करायचा याचा निर्णय होणार आहे. गेल्या हंगामात साखरेचे कमी झालेलं उत्पादन आणि त्यामुळे साखरेचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरू केला जाणार आहे.तसे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत.
दरवर्षी उसाचा गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू केला जातो मात्र यावेळी 15 ऑक्टोबर पासूनच उसाचा हंगाम सुरू सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.मात्र याला कारखानदारांनी विरोध दर्शवला आहे. जर उसाचा हंगाम लवकर सुरू केला तर उतार्यामध्ये त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे साखर कारखानदार लवकर हंगाम सुरू करण्यास तयार होत नाहीत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











