mahankali news : महांकाली कारखान्यात शेतकरी विकास पॅनेलचा सर्व जागावर विजय : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या नेत्या चेअरमन अनिता वहिनी सगरे यांच्या नेतृत्वाखालील महांकाली शेतकरी विकास पॅनेलचे सर्वच्या सर्व 17 उमेदवार विजयी झाले. महांकाली साखर कारखान्यावर चेअरमन अनिता वहिनी सगरे यांचा झेंडा फडकला. निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळविले.तर विरोधी कारखाना बचाव समिती पॅनेलची झुंज अपयशी ठरली.
mahankali news : महांकाली कारखान्यात शेतकरी विकास पॅनेलचा सर्व जागावर विजय
अनिता सगरे यांचा झेंडा, जनसुराज्य पक्षाचे वर्चस्व
महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या 6 सप्टेंबर रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 14 हजार 872 पैकी 8 हजार 58 मतदान झाले होते. एकूण 54:18 टक्के मतदान झाले होते. दि. 9 रोजी नगरपंचायतीच्या लोकशाहीर राजा पाटील सभागृहात मतमोजणी पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या नियो जनाखाली मतमोजणी पार पडली. रात्री 10 वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती.
महांकाली शेतकरी विकास पॅनेलचे निवडून आलेले उमेदवार
सर्वसाधारण गट
अनिता विजयकुमार सगरे
दीपक गणपतराव ओलेकर
जीवन वसंतराव भोसले
सुहास शिवाजीराव पाटील
सागर सूर्यकांत पाटील
मोहन निवृत्ती खोत
भीमराव विठ्ठल कोळेकर
प्रकाश पंडित पाटील बंडगर
संभाजी सर्जेराव पवार
कुमार आप्पासो पाटील
काशिलिंग शामराव कोळेकर
अरविंद सदाशिव स्वामी
दीपक अच्युतराव चव्हाण
महिला गट
छाया पुंडलिक पाटील
अनुराधा गणपती सगरे
अनुसुचित जाती/जमाती गट =
निखिल संजय बनसोडे
बिगर उत्पादक गट
शंतनु विजयकुमार सगरे
जनसुराज्य नेत्यांचे प्रयत्न =
महांकाली साखर कारखान्याच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच जनसुराज्य शक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ. विनयराव कोरे व जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी चेअरमन अनिता वहिनी यांना चांगलेच पाठबळ दिले.
कर्नाटक मतदार सगरेंच्पा पाठीशी =
मल्टीस्टेट असलेल्या महांकाली साखर कारखान्याचे सभासद कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील आहेत. कर्नाटक राज्यातील एकूण 1हजार 832 सभासद आहे. अनंतपुर मतदान केंद्रावर चेअरमन अनिता वहिनी सगरे यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना सुमारे 80 ते 90 टक्के मते मिळाली आहेत. कर्नाटक राज्यातील मतदारांनी अनिता सगरे यांना भरघोस पाठींबा दिला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











