जिल्ह्याचे राजकीय सत्ता केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीचे बिगुल अखेर वाजले. बुधवारी निवडणूकीची अधिसुचना प्रसिध्द होणार आहे. गुरुवार दि. 24 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 1 नोव्हेंबरला मतदार तर 3 रोजी मतमोजणी होणार आहे. बॅँकेची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरु झाली आहे. दरम्यान सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलला भाजपकडून शह देण्याचा प्रयत्न सुरू असून निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्याचा राजकीय आखाडा पुन्हा तापणार असल्याचे स्पष्ट झाले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबर 2026 मध्ये संपत आहे. या पार्श्वभुमीवर बॅँकेच्या निवडणूकीची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सुरु केली होती. सभासद संस्थांकडे ठराव मागवून प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली. या यादीवर तब्बल 273 हरकती दाखल झाल्या होत्यावर त्यावर सुनावणी होवून अंतीम मतदार यादी 11 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. अंतीम मतदार यादीत बॅँकेच्या निवडणूकीसाठी 2473 सभासद मतदानास पात्र ठरले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणूकीची 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या कालावधीत सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अर्जांची छानणी 5 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. तर पात्र उमेदवारांची यादी 6 रोजी जाहीर होणार आहे. 6 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 1 नोव्हेंबरला मतदान तर 3 रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज दाखल करणे – 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर
- उमेदवारी अर्जांची छानणी : 5 ऑक्टोंबर
- उमेदवारी अर्ज माघारीची मुदत : 6 ते 21 ऑक्टोंबर
- मतदान – 1 नोव्हेंबर
- मतमोजणी – 3 नोव्हेंबर
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणूकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बॅँकेवर गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. कॉग्रेसही राष्ट्रवादी सोबत सत्तेत आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बॅँकेत विशेष लक्ष दिले असून भाजप पॅनेल उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजीत कदम यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











