tirupti news : तिरूपती बालाजीला तब्बल 121 किलो सोनं दान

SHARE:

tirupti news : तिरूपती बालाजीला तब्बल 121 किलो सोनं दानदेशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे, येथील दानपेटीत किंवा बालाजीचरणी देखील भाविक मोठं दान करतात. सोनं-चांदी, हिरे, यांसह मौल्यवान वस्तूंची भेट तिरुपती बालाजीला दिली जाते. आता, चक्क 160 कोटी रुपयांचं सोनं एका भक्ताने तिरुपती बालाजी मंदिरात अर्पण केल्याची माहिती आहे. या भाविकाच्या दानशूरपणावर सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

tirupti news : तिरूपती बालाजीला तब्बल 121 किलो सोनं दान

तिरुपती बालाजी मंदिरात भाविक सोन्याची नाणी, मौल्यवान वस्तू यांच्यासह विविध भेटवस्तू किंवा दान अर्पण केले जाते. काही भाविक आपलं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात किलो-किलो सोनं किंवा चांदीही दान करतात. त्यामुळेच, देशभरातील श्रीमंत देवस्थान म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. आता, चेन्नईतील एका व्यापार्‍याने तब्बल 121 किलो सोनं तिरुपती चरणी अर्पण केलं आहे. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत 160 कोटी रुपये एवढी आहे.

तिरुपती बालाजी चरणी तब्बल 121 किलो सोनं दान करणार्‍या उद्योगपतीचं नाव वर्धमान जैन असून त्यांनी हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि ऑटोमेशन क्षेत्रात आपले उद्योग उभारले आहेत. प्रामुख्याने ’अ‍ॅक्सेस हेल्थकेयर’ चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. ही कंपनी हेल्थकेअर इंडस्ट्री टेक्नोलॉजी बेस्ड सर्व्हिसेज देते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांची पत्नी यांच्यासमवेत वर्धमान जैन यांनी तिरुपती चरणी तब्बल 121 किलो सोनं दान केलं. त्यामध्ये, तिरुपतीसाठी दागिने आणि मुकुट देखील दान केला आहे. आता, भगवान वेंकटेश्वर म्हणजेच तिरुपती बालाजीला 27 नवंबर रोजी हे दागिने परिधान केले जाणार आहेत.

वधर्मान जैन यांनी पहले चेन्नईतील लॉयोला कॉलेजमधून स्टॅटिक्सची पदवी घेतली आहे. त्यानंतर, ते अमेरिकेला गेले, तिथं राहून ऑस्टिनमधील टॅक्सास युनिव्हर्सिटीतून कॉप्यूटर सायंसची पदव्युत्तर पदवी घेतली. काही वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर वर्धमान जैन यांनी हेल्थकेअर टेक्नोलॉजी, मेडिकल कोडिंग, इमेज प्रोसेसिंग आणि रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशनमध्ये एक्सपर्टाइज प्राप्त केली आहे.

जैन यांच्या उद्योगविश्वाला 2025 मध्ये टर्निंग पॉईंट मिळाला, जेव्हा त्यांनी आपल्या ’अ‍ॅक्सेस हेल्थकेयर’ कंपनीत 70% हिस्सेदारी एका अमेरिकीन कंपनीला विक्री केली. जवळपास 2 अब्ज डॉलर एवढी ही डील होती. या मोठ्या आर्थिक करारामुळे वर्धमान जैन यांची कंपनी चर्चेत आली. तसेच, जैन यांच्या उद्योजकीय कारकिर्दीतलं हे मोठं यश मानलं जातं. यासह, ते आशिया चेन्नई इंजीनियरिंग आणि इतरही कंपन्यांशी जोडले गेले आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *