ashta news : आष्टातील वाढलेली नशेखोरी मोडा…जयंत पाटलांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

SHARE:

ashta news : आष्टातील वाढलेली नशेखोरी मोडा…जयंत पाटलांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन : आष्टा परिसरात नशेखोरीत अल्पवयीन मुले अडकली आहेत. जागोजागी अड्डे फोफावले आहेत. गोळ्या, इंजेक्शनचा खच पडला आहे. पुढील पिढी बरबाद होत आहे. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे निवेदन आ. जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दिले. पोलीस अधीक्षकांनी तातडीने एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांना आदेश देण्यात आले. तसेच स्वतः आष्टा शहरातील डार्क स्पॉटवर भेटी देऊन कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले.

ashta news : आष्टातील वाढलेली नशेखोरी मोडा…जयंत पाटलांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

सांगलीसह राज्यातील अनेक शहरांत खुलेआम नशेखोरी सुरू आहे. त्याचे अड्डे वाढले आहेत. ‘डार्क स्पॉट’वर नशेखोरांकडून धिंगाणा सुरू आहे. याबाबत सातत्याने विधानसभेत आवाज उठवला, परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद नाही. त्यावर अंमल केला जात नाही, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज केली. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची त्यांनी आज भेट घेतली. सांगलीसह आष्टा येथील नशेखोरी रोखण्याबाबत त्यांनी निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांत नशेखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यात सांगलीदेखील आहे. लहान बालके, मुलींवरील अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. सरकारने कडकपणाने लक्ष घालण्याची गरज आहे. विधानसभेत अनेक वेळा मुद्दे मांडले. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद नाही. त्याच्यावर अंमल होत नाही.

गुन्हेगारांचा ’आपल्यावर कोणीही अंकुश ठेवणारे नाही’ असा आत्मविश्वास बळावला आहे. समृद्धी महामार्गावर नंबर प्लेट काढून वाटमारी केली जाते. पोलीस यंत्रणा गुन्हा झाल्यावर पोहोचते. गुन्हा होऊच नये, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.’’ सीसीटीव्हीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘मी पालकमंत्री असताना विटा, आष्टा, तासगाव शहरांसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. आता शहरांची व्याप्ती वाढली आहे, सीसीटीव्हीची मागणी होत आहे. सीसीटीव्ही असले तर गुन्हेगारी रोखण्यात मदत होईल, तसेच नशेखोरीही कमी होईल. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहे.’’

यावेळी नगराध्यक्ष विशाल शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, दुध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, विराज शिंदे व नगरसेवक उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *