bidri sugar factory news : बिद्री’ने ऊस दर वाढवला; प्रतिटन 3 हजार 614 रुपये : कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याने आधी जाहीर केलेल्या प्रतिटन 3 हजार 452 रुपये रक्कम ऊस दरात बदल करून मंगळवारी त्यामध्ये 162 रुपयांची वाढ केली. आता या कारखान्याकडून ऊसउत्पादकांना या गळीत हंगामासाठी प्रतिटन 3 हजार 614 रुपये एकरकमी ऊसदर देण्यात येणार आहे. या ऊस दराचे शेतकर्याने आंदोलन स्वागत केले असतानाच हा ऊसदर आंदोलनाचा परिणाम असल्याचीही चर्चा आहे.
bidri sugar factory news : बिद्री’ने ऊस दर वाढवला; प्रतिटन 3 हजार 614 रुपये
ऊस दर आंदोलनाचा परिणाम
बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामासाठी प्रतिटन 3 हजार 452 रुपये विनाकपात पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यामध्ये बदल करून आता तो प्रतिटन 3 हजार 614 रुपये एकरकमी जाहीर केला आहे.
सध्याच्या बाजारस्थितीत हा दर राज्यातील सर्वाधिक ऊसदरांपैकी एक आहे. हा निर्णय कारखान्याच्या शेतकर्यांना सर्वोच्च प्राधान्य या परंपरेला साजेसा ठरला आहे. बिद्रीने शेतकर्यांच्या विश्वासावर उभी राहिलेली प्रगती कायम ठेवली आहे.
अवकाळी पावसातही बिद्रीचा शेतकरी हिताचा ऊसदर आहे, असे मत कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सांगितले. उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी ऊस दरासोबत कृषिपूरक उपक्रम राबवून शेतकर्यांना सर्वांगीण साहाय्य देण्याचा प्रयत्न बिद्री कारखान्याने केला असल्याचे नमूद केले.
पाटील म्हणाले, की रासायनिक खते, औषधे, इंधन आदींचा दर प्रचंड वाढला असून, शेतकर्यांचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढवणे, उसाला योग्य दर देणे गरजेचे आहे. बिद्रीने शेतकर्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
विस्तारीकरणानंतर कारखाना प्रतिदिन 8 हजार 500 टन क्षमतेने गाळप करण्यास सज्ज असून, तोडणी-वाहतूक यंत्रणा सज्ज झाली आहे. अजूनही पावसाची शक्यता असल्याने सुरुवातीला रस्त्याकडेच्या आणि नंतर पूर्ण क्षमतेने ऊसतोड नियोजन केले आहे. 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊसउत्पादक शेतकर्यांनी सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले. संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे, खातेप्रमुख उपस्थित होते.
बिद्री सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांचे मिळून कार्यक्षेत्र असलेला कारखाना आहे. या कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक आहे. यामुळे स्वाभाविक साखर कारखान्याकडून सर्वाधिक दर देण्याची परंपरा दर वर्षी कायम राहिली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











