rajkiyalive

budhgaon crime news : बुधगावमध्ये एटीएम फोडून 17 लाख लांबवले

budhgaon crime news : बुधगावमध्ये एटीएम फोडून 17 लाख लांबवले : मिरज तालुक्यातील बुधगाव येथे पहाटेच्या अंधारात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले. अवघ्या काही मिनीटात त्यातील तब्बल 17 लाख 46 हजारांची रोकड लंपास करुन त्यांनी पोबारा केला. गॅस कटरने मशीन तोडण्याचा प्रयत्न झाल्याने मशीन काही प्रमाणात जळाले होते.

budhgaon crime news : बुधगावमध्ये एटीएम फोडून 17 लाख लांबवले

चोरटे स्थानिक नसून परराज्यातील असल्याचा पोलिसांना कयास असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची तीन पथके त्यांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी एटीएम केंद्राच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या कोल्हापूर येथील निशा कंपनीचे पर्यवेक्षक संभाजी मारुती चव्हाण (रा. फुलेवाडी, रिंग रोड, कोल्हापूर) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधगाव कवलापूर रस्त्यावरील बस थांब्यानजीक बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम केंद्र आहे.

या एसटीएम मशीनमध्ये तीन दिवसांपूर्वीच लाखो रुपयांची रोकड भरण्यात आली होती. बुधवार दि. 21 मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे चारचाकीतून एटीएम केंद्रापाशी आले. चोरट्यांनी चेहर्‍यावर काळा मास्क लावला होता. सदर एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्याने त्यांनी निर्धास्तपणे आत प्रवेश केला. याठिकाणी असणारे सीसीटीव्ही तातडीने बंद केले. त्यानंतर एटीएमचे मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील 17 लाख 46 हजारांची रोकड काढून घेतली.

ही घटना अवघ्या काही मिनीटात झाली. एटीएम मशीन फोडताना चोरट्यांनी एटीएम केंद्राला असणारे शटर लावले होते.

सीसीटिव्ही त्यांनी बंद करण्यापूर्वी चोरट्यांचे चित्रीकरण सीसीटिव्हीत कैद झाले आहे. साधारणत: 5.30 पासून सकाळी फिरण्यासाठी जाणार्‍या लोकांची ये – जा सुरु झाली. तत्पूर्वी रस्त्यावर वाहतूक देखील तुरळक होती. काही वेळानंतर एटीएम मशीन फोडल्याची घटना नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर तातडीने पोलीसांना याची कल्पना देण्यात आली.

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी पथकांसह त्याठिकाणी धाव घेतली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली. दरम्यान, पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीने खळबळ उडाली होती.

budhgaon-crime-news-17-lakhs-stolen-by-breaking-atm-in-budhgaon

शहापूर नंतर थेट बुधगाव मधील एटीएम सेंटर फोडले…

संशयित चोरट्यांनी सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथील एटीएम सेंटर फोडून तेथील लाखोंची रोकड लंपास केली. यानंतर त्यांनी आपला मोर्चा बुधगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनकडे वळवला. याठिकाणी सुरक्षा रक्षक तसेच नागरिकांची वर्दळ नसल्याचे पाहून एटीएम मशीन फोडून रोकड लंपास करत धाडसी चोरी केली. एकाच रात्री कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ड़एटीएम लुटल्याने पोलिसांपुढे या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. घटना घडल्यानंतर तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषणची तीन आणि सांगली ग्रामीण पोलिसांचे एक पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज