धावते कुटुंबीयांना मिळाला मान
dudhgaon sangli jain samaj news : दुधगावमध्ये पंचकल्याण पुजेच्या यजमान पदाचा सवाल 42 लाख 51 हजार : मिरज तालुक्यातील दुधगाव येथील श्री 1008 पार्श्वनाथ जिनमंदिरतर्फे 4 मे ते 10 मे 2025 अखेर पंचकल्याणक पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पुजेच्या यजमानपदाचा सवाल 26 जानेवारी रोजी काढण्यात आला. दुधगाव येथील आप्पासो बाळगोंडा पाटील धावते यांना यजमानपदाचा मान मिळाला. 42 लाख 51 हजार रूपयाला त्यांना मान मिळाला. दुधगाव परिसरात आजपर्यंत झालेल्या पुजेतील सर्वात मोठा सवाल झाला आहे.
dudhgaon sangli jain samaj news : दुधगावमध्ये पंचकल्याण पुजेच्या यजमान पदाचा सवाल 42 लाख 51 हजार
दुधगावमध्ये अनेक वर्षानंतर पंचकल्याण पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पुजेसाठी आचार्य सन्मतीसागरज महाराज यांचे परम शिष्य धर्मसागरजी महाराज, आगम चक्रवर्ती विद्यासागरजी महाराज, प्रशांतसागरजी महाराज, आगमसागरजी महाराज यांच्या आशिर्वादाने या पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. मे मह्रिन्यात होणार्या या पुजेसाठी 25 जानेवारी रोजी सवाल काढण्यात आले यावेळी अनेक श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौधर्म इंद्र इंद्रायणी आप्पासो बाळगोंडा पाटील धावते, तीर्थंकर माता पिता सुरगोंडा रायगोंडा पाटील चक्रे, धनपती कुबेर श्रेणिक भरमा चौगुले, ईशान्य इंद्र शितल उल्हास आडमुठे, धर्मा, चक्रवर्ती संजय राजगोंडा पाटील खिडबिडे, महायज्ञनायक सुभाष यशवंत मगदूम, सुवर्ण सौभाग्यवती मोहन गुणधर कोले, ध्वजारोहण भरत जयकुमार साजणे, अखंड दीपस्थापना अजित आण्णा शिराळकर, मंडप उद्घाटक वसंत जिन्नाप्पा हेरवाडे, द्वादश इंद्र संदीप तात्यसो चोपडे, द्वादश इंद्र 2 बाळासाहेब दादा हेरवाडे, दवादश इंद्र 3 विद्यासागर देवेंद्र पाटील, द्वादश इंद्र 4 भूषण प्रकाश रूकडे, द्वादश इंद्र 5 अरूण बाळासो कुदळे आदींनाही पुजेचा मान मिळाला.
यावेळी ऋषभसेन उपाध्ये, राजेंद्र जैन उमरगा हेही उपस्थित होते. सवालानंतर विद्यासागर महाराज यांचे मंगल प्रवचन झाले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.