grampanchyat election news : सांगली जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायतींचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर : राज्य निवडणूक आयोगाने सन 2024-25 मध्ये मुदत संपलेल्या 4 तसेच सन 2025-26 मध्ये मुदत संपणार्या 152 अशा 156 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 24 जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर हरकती आणि सूचनांनंतर 4 ऑगस्टला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
grampanchyat election news : सांगली जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायतींचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर
24 जुलैला प्रारुप यादी जाहीर होणार
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभांमध्ये पार पडली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार 24 जुलै 2026 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 24 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदारांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
प्राप्त हरकती व सूचनांची छाननी करून आवश्यक बदल करण्यात आल्यानंतर 4 ऑगस्ट 2026 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अंतिम यादीच्या आधारे पुढील निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादी अत्यंत महत्त्वाची असल्याने संबंधित नागरिकांनी प्रारूप यादीमध्ये आपले नाव, पत्ता व इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत. कोणतीही त्रुटी आढळल्यास विहित मुदतीत हरकत किंवा सूचना संबंधित निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनीही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदार यादी कार्यक्रम
– प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ः 24 जुलै
– मतदारांना हरकती व सूचना ः 24 ते 29 जुलै
– अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ः 4 ऑगस्ट
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










