iayant patil news : राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.5 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता कारखाना कार्यस्थळावरील प्रांगणात संपन्न होत आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे या सभेस मार्गदर्शन करणार आहेत.
iayant patil news : राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा
कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केले आहे.
स्व.बापूंनी 1968 साली साखराळेच्या माळावर साखर कारखान्याची उभारणी करून वाळवा तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. तर माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. या प्रगतीत ऊस उत्पादक सभासदांचा वाटा मोलाचा आहे. कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सभेची नोटीस, अहवाल ऊस उत्पादक सभासदांना पोहच केलेले आहेत.
सभासदांनी या सभेस वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे,असे आवाहन प्रतिकदादा पाटील यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, देवराज पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, अतुल पाटील, अमरसिंह साळुंखे, डॉ.योजना शिंदे-पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, सचिव डी.एम.पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी सभेची तयारी करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











