jayant patil news : राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटमध्ये रोलर पूजन: राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे कारंदवाडी युनिट माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असून आम्ही ऊस उत्पादक शेतकरी,कामगार व हितचिंतकांच्या सहकार्याने यावर्षीचे निश्चित उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास ’राजारामबापू’चे संचालक रघुनाथ जाधव यांनी व्यक्त केला.
jayant patil news : राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटमध्ये रोलर पूजन
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटमध्ये श्री. जाधव यांच्या हस्ते सन 2025-26 गळीत हंगामाचे रोलर पूजन करुन करण्यात आले. यावेळी जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदिप कुमार पाटील,संचालक बबनराव थोटे,रमेश हाके,वैभव साळुंखे-पाटील,सचिव डी.एम. पाटील,जनरल मॅनेंजर (वर्क्स) विजय मोरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संचालक रघुनाथ जाधव म्हणाले,गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम कमी दिवस चालला. यावर्षी ऊसाचे प्रमाण चांगले आहे. शेतकर्यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे.
jayant-patil-news-roller-pujan-at-karandwadi-unit-of-rajarambapu-factory
याप्रसंगी चीफ केमिस्ट उमेश शेटे,डेप्युटी चीफ इंजिनियर संग्राम चव्हाण,सुरक्षाधिकारी जयवंत पाटील,सिव्हिल विभागचे सुधाकर पाटील,शेती विभागचे संग्राम पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.जयपाल तामगावे,केनयार्डचे विजय पाटील,स्टोअर विभागचे अकिल मुजावर,प्रताप गुरव यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











