jayant patil news : महामार्ग रद्द केला जाणार नाही; तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील : सरकार शेतकर्यांचा विरोध डावलून हा महामार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकर्यांच्या सोबत आहोत. जोपर्यंत हा महामार्ग रद्द केला जाणार नाही; तोपर्यंत आमचा लढा सरकार विरोधात असाच सुरू राहील, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिला.
jayant patil news : महामार्ग रद्द केला जाणार नाही; तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील
आ. जयंत पाटील : पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्धी द्या
महाविकास आघाडीच्या नेत्यांचे साकडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 25 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला येणार आहेत. त्यावेळी पांडुरंगाने मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी, असे साकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विठुरायाला घातले. शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारला आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. प्रसंगी आम्ही रक्त सांडू; पण जमीन देणार नाही, असा थेट इशाराही राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी 12 जिल्ह्यांतील बाधित शेतकर्यांनी इसबावी ते विठ्ठल मंदिर अशी सुबुद्धी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सतेज पाटील, रासपचे नेते महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

इसबावी येथील एका मंगल कार्यालयामध्ये आज सकाळी बाधित शेतकर्यांचा मेळावा झाला, त्यानंतर इसबावी ते विठ्ठल मंदिर अशी भरपावसात या नेतेमंडळींच्या उपस्थितीत सुबुद्धी दिंडी काढण्यात आली. सुमारे सहा ते सात किलोमीटर पायी दिंडीमध्ये सुमारे 2000 शेतकर्यांसह महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले होते.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, आमची घरंदारं मोडून तुम्ही विकास करणार असाल तर आम्ही सरकारचं थडगं बांधायला देखील मागेपुढे पाहणार नाही. शक्तीपीठ महामार्ग हा अदानी-अंबानी अशा मोठ्या उद्योगपतींसाठी तयार केला जाणार आहे. या महामार्गाचा शेतकर्यांना काडीचाही उपयोग होणार नाही. उलट महामार्गावरून जाणार्यांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी जवळपास अडीच हजार एकर शेती बाधित होणार आहे. या शेतकर्यांना सरकार वार्यावर सोडणार का, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपुरात येणार आहेत, त्यांनी विठ्ठलाच्या साक्षीने वेदांत जोशी, सुनील जोशी, फी प्रभाकरन हे कोण आहेत, हे वारकर्यांना सांगावे, असे खुले आव्हान ही यावेळी शेट्टी यांनी केले.
या वेळी महादेव जानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील, आमदार अभिजीत पाटील यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










