jayant patil news : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ताकदीने लढविणार -आ. जयंतराव पाटील : आपल्या पक्षाला नगरपालिका निवडणुकीत जे यश मिळाले,ते माझ्या एकट्याचे नव्हे, तर आपण कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे यश आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही ताकदीने लढून पक्षाची ताकद दाखवून देऊ,असा विश्वास माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी कासेगाव (ता. वाळवा) येथील जाहीर समारंभात बोलताना व्यक्त केला.
jayant patil news : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ताकदीने लढविणार -आ. जयंतराव पाटील
येथील पदयात्री स्मारकात सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उरुण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, आष्ट्याचे नगराध्यक्ष विशाल शिंदे,तसेच उरुण ईश्वरपूर,आष्टा व तासगांव नगरपालिका निवडणुकीत विजयी नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आ.मानसिंग नाईक,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे,जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जेष्ठ नेते सुरेश पाटील,मनोज शिंदे,रावसाहेब पाटील,माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष अँड.बाबासाहेब मुळीक,सरपंच कल्पना गावडे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,नगरपालिका निवडणुकीत उरुण ईश्वरपूर,आष्टा व तासगांवमध्ये शहरात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. जतमध्येही काँग्रेस पक्षाशी आघाडी करून निवडणूक लढलो असतो,तर वेगळा निकाल आला असता. सांगली, कुपवाड व मिरज महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी आघाडी करून ताकदीचे उमेदवार दिले आहेत.
या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळू शकते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपणाशी चर्चा करून दिशा निश्चित केली जाईल. या निवडणुकीत सर्व जागा लढविण्याऐवजी पक्षाची ताकद असणार्या जागा लढविण्यावर भर देणार आहोत.
माजी आ.मानसिंग नाईक म्हणाले,येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपला पक्ष जिल्ह्यात नंबर वन करण्यासाठी कामाला लागूया. वैभव शिंदे म्हणाले, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्यावर जनतेने विश्वास दाखविला आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वानी कष्ट घ्यावे.
जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात,नगरपालिका निवडणुकीत आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मिळालेल्या यशाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ आले आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही पक्षाची ताकद दाखवून देऊया. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तजुद्दीन तांबोळी, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच आनंदराव मलगुंडे,विशाल शिंदे यांनी सत्कारास उत्तर दिले.
प्रारंभी जिल्हा कार्याध्यक्ष अँड.बाबासो मुळीक यांनी स्वागत केले.याप्रसंगी मन्सूर खतीब,दिनकर पाटील,हायूम सावनूरकर,राजाराबापू दूध संघांचे अध्यक्ष संग्राम फडतरे,शहाजी पाटील,विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील, अँड.विश्वासराव पाटील,आनंदराव पाटील,रमेश पाटील,हणमंत देशमुख,दत्ताजी पाटील,तसेच उदयबापू पाटील,सुरेंद्रदादा पाटील,सुभाष आडके, सुरेश गावडे,रामभाऊ माळी,प्रताप पाटील, उपसरपंच सुजित पाटील,दाजी गावडे,अतुल लाहिगडे यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी,तसेच कासेगावतील कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष टी.व्ही.पाटील यांनी आभार मानले. प्रा.संतोष जाधव,प्रा.कृष्णा मंडले यांनी सूत्रसंचालन केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











