rajkiyalive

karanswadi crime news : कारंदवाडीत विवाहितेला सांभाळण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार :

व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

karanswadi crime news : कारंदवाडीतविवाहितेला सांभाळण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार : : वाळवा तालुक्यातील एका शहरात राहणार्‍या विवाहितेला आमिष दाखवून तसेच तिची मुले सांभाळण्याचे आश्वासन देऊन सांगलीतील विविध ठिकाणी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. सदर अत्याचाराची घटना हि जानेवारी 2024 ते दि. 13 मे 2025 या कालावधीत घडली. या प्रकरणी पीडित महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित ऋत्विक अरुण वाडकर (रा. कारंदवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

karanswadi crime news : कारंदवाडीत विवाहितेला सांभाळण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार :

याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित महिला हि वाळवा तालुक्यातील एका शहरात राहते. संशयित ऋत्विक वाडकर आणि पीडितेची ओळख झाली होती. पीडितेला संशयिताने मी तुला व तुझ्या मुलांना सांभाळतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर जानेवारी 2024 ते वारंवार अत्याचार केले.

पीडिता या गरोदर राहिल्याने त्यांनी संशयित वाडकर याला सांगितले असता त्याने माझ्या घराचे तुला स्वीकारणार नाहीत असे म्ह्णून वाद घालून निघून गेला. यानंतर पुन्हा दोन दिवसांनी येऊन समजूत घालून अत्याचार केले. यावेळी त्याने आक्षेपार्ह व्हिडीओ घेताना पीडितेस निदर्शनास आले.

यावेळी पीडितेने त्याला जाब विचारला असता पीडितेचा मोबाईल फोडला आणि तु जर पोलिसात तक्रार केली तर आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत निघून गेला. घडलेल्या या प्रकारानंतर पीडितेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज