khanderajuri news : खंडेराजुरीतील शेतकर्यांनी घातले तलाठ्यास कोंडून : मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे शेतकर्यांच्या संमती न घेता , एका पुढार्याचा ऐकूण पाणंद रस्त्याच्या चुकीच्या नोंदी घातल्याने संतप्त खंडेराजुरी ग्रामस्यांनी तलाठी सचिन पाटील यांना तब्बल दोन तास कोंडून घातले.
khanderajuri news : खंडेराजुरीतील शेतकर्यांनी घातले तलाठ्यास कोंडून
शेतकर्यांनी व ग्रामपंचायतीने 29 पानंद रस्ते सुचवले होते पण तलाठ्याने एकाच्या सांगण्यावरून वीसच नोंदी आल्याचे सांगितले . त्यातील सहा पानंद रस्त्याच्या नोंदी केल्या पण त्या नोंदी कोणतेही शेतकर्यांना नोटीस न देता ,शेतकर्यांची संमती न घेता, स्पॉट व्हिजिट न करता ,रस्ता पाहणी न करता, ड्रोन सर्वे नाही, एकच गट दोन रस्त्यांना दाखवून कोणाचे तरी ऐकून वरिष्ठांना चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
सहा नोंदवलेले रस्त्यामध्ये तीन रस्ते चुकीचे तेही त्या पुढार्यांच्या म्हणण्याप्रमाणे नोंद केल्याचे निदर्शनास येताच शेतकर्यानी तहसीलदारांना भेटून विचारले पण तहसीलदार कार्यालयाने शेतकर्यांना उडवून लावले. अपील करा कोर्टात जावा असे सांगितले.
संतप्त शेतकर्यानी तलाठी कार्यालयाची चूक लक्षात येताच तलाठ्यांना कुलूप घालून तब्बल दोन तास कार्यालयात कोंडून घातले. शेतकर्यांनी तुम्ही चूक करायचे आणि आम्ही कोर्टात पैसे घालायचे तुमची चूक आहे तुम्हीच दुरुस्त करा. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि तुमच्या चुकीमुळे पुन्हा न्यायालयात जावा , अपील करा हे कोणाच्या सांगण्यावरून करत आहे असाच तुमचा विचारला.
यावेळी शेतकरी बबन पाटील , अजित पाटील, गणेश पाटील म्हणाले तलाठ्याने बेजबाबदारपणे कोणत्याही रस्त्याला कोणताही गट नंबर दिला आहे. स्थळ पाहणी न करता, नोटीस न देता , दुसर्या गावचे गट नंबर देऊन डायरेक्ट नोंदी घातल्यास कशा असा सवाल केला? चुका तलाठ्याच्या आणि आम्ही अपील करायचं शेतकर्यांवर किती अन्याय करणार असा सवाल उपस्थित शेतकर्यांनी केला? खंडेराजुरीकराच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील महसूल कर्मचार्यात खळबळ उडाली आहे.
खंडेराजुरीत तलाठी सचिन पाटील यांना कोंडून घातल्याचे समजतात मंडल अधिकारी पोपट ओमासे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, तलाठी भास्कर पाटील यांनी खंडेराजुरी धाव घेतली. त्यानी आक्रमक शेतकर्यांना शांत केले व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर कोणती पाहणी न करता नोंदी बेजबाबदारपणे चुकीच्या झाल्या आहेत हे लक्षात आल्यानंतर सर्वच नोंदी रद्द करून शेतकर्यांच्या सहमतीने ,रस्ते पाहणी करून ,संमती नोंद करून दहा दिवसात पुन्हा सर्वे करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकर्याने आंदोलन मागे घेतले.
यावेळी विजय चव्हाण, बबन पाटील ,संभाजी चव्हाण, गणेश पाटील ,तुकाराम पाटील, सुभाष पाटील, अजित पाटील, शामराव पाटील, संदीप पाटील ,वसंत पाटील सह 50 शेतकरी उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










