korochi news : कोरोचीत ऑनलाईन गेममुळे युवकाचा बळी

SHARE:

korochi news : कोरोचीत ऑनलाईन गेममुळे युवकाचा बळी :  हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यातून युवकाने गळफास घेऊन जीवन संपवले. अदित्य मिलिंद कोळी (वय 24) असे त्याचे नाव आहे. त्याने मृत्यूपूर्वी लिहीलेली सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळी मिळून आली आहे. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

korochi news : कोरोचीत ऑनलाईन गेममुळे युवकाचा बळी

अदित्य याने शनिवारी (दि.18) सायंकाळी घरातील सदस्य कामात असताना वरच्या मजल्यावरील खोलीतील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेची वर्दी चुलत भाऊ भालचंद्र संजय कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये जीवन संपवण्यापूर्वी आदित्यने लिहिलेली एक चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये त्याने आपल्याला ऑनलाईन गेमिंगचा नाद लागल्याचे आणि त्यामध्ये लावलेले पैसे हरल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.

वर्षभरापूर्वीच अदित्यच्या वडिलांचे छत्र हरपले होते. घरी आई, लहान बहीण व आदित्य असे तिघेजण राहत होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असतानाच, ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकल्याने आदित्यने आयुष्य संपवल्याने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अदित्य हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने परिसरात त्याचा मोठा मित्रपरिवार होता. मात्र, ऑनलाईन गेमिंगच्या छुप्या व्यसनाने त्याचा बळी घेतल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तपास सहाय्यक फौजदार सुवर्णा गायकवाड करीत आहेत.

अदित्य यांने मोबाईलवर ऑनलाइन गेमिंगचे प डाऊनलोड करून प्रथम दहा हजार रुपये घालवले. त्यानंतर मित्रांकडून पैसे घेऊन तेही हरला. मोबाईल 35 हजार रुपयेला विकून गेम खेळला. त्यानंतर 80 हजार रुपये इतर ठिकाणाहून घेऊन खेळात घालवले. कर्जबाजारी पणाच्या नैराशातून त्यांने आपले जीवन संपविले. याला कोणास जबाबदार धरू नये असेही त्याने चिठ्ठीत म्हटले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *