mukhyamantri news : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला मुदतवाढ : ग्रामविकास विभागाच्यावतीने तब्बल 290 कोटी रुपयांचे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाले खरे. परंतु, तत्कालीन पूरस्थिती आणि सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग यामुळे 31 मार्च 2026 पर्यंत या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
mukhyamantri news : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला मुदतवाढ
ग्रामविकास विभागाचे महत्त्वाकांक्षी अभियान म्हणून या अभियानाकडे पाहिले जाते. यातील यशस्वी ग्रामपंचायतींना तब्बल 245 कोटी 20 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान सुरूही झाले. परंतु, 29 जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली. शासनाला त्यासाठी 32 हजार कोटींचे पॅकेजही जाहीर करावे लागले.
दिवाळी संपल्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या. सध्या महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अभियान केवळ प्रशासकीय राहण्याची भीती व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी याबाबत चर्चाही केली. परंतु लगेचच मुदतवाढ दिली तर सुरू असलेले कामही थांबायला नको यासाठी ही मुदतवाढ उशिरा जाहीर करण्यात आली.
या अभियानात दरवर्षी 20 टक्के गावांचा सहभाग आणि नवीन गावांना बक्षिसे अशी दुरुस्ती करण्यात आली असून, सर्वच गावांवर एकाचवेळी लक्ष केंद्रित करण्यापेक्षा दरवर्षी 20 टक्के गावांमध्ये अभियान परिणामकारक पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच त्याच गावांना बक्षिसे न मिळता ती नवनवीन गावांना मिळावीत, असेही नियोजन आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











