nagarpalika election news : नगरपालिका, नगरपंचायतसाठी ऑफलाईन अर्ज भरता येणार : जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आता उमेदवारी भरण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. रविवारी या सुट्टीच्या दिवशीही उमेदवारांना अर्ज भरता येणार येईल. सोमवारी (दि. 17) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने झुंबड उडणार असल्याचे चित्र आहे.
nagarpalika election news : नगरपालिका, नगरपंचायतसाठी ऑफलाईन अर्ज भरता येणार
रविवारी अर्ज भरता येणार, अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटची मुदत
जिल्ह्यातील ऊरुण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस नगरपालिका व शिराळा, आटपाडी या दोन नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. उमेदवारी दि. 10 नोव्हेबर ते दि. 17 नोव्हेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 वेळेत अर्ज स्वीकारले जात आहेत. तसेच या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु यात तांत्रिक अडचण येत असल्याने विविध राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे घेण्याची मागणी करण्यात आली होती. उमेदवारांना आता ऑफलाईन पद्धतीनेही उमेदवारी भरता येणार आहे. रविवार या सुट्टीच्या दिवशीही उमेदवारांना अर्ज भरता येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, उमेदवारी आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून उमेदवारांना दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. अशातच आता ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असल्याने इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नगराध्यक्षसाठी 40 तर नगरसेवकसाठी 347 अर्ज
जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतसाठी शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी 29 आणि सदस्य पदासाठी 240 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आत्तापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 40 आणि नगरसेवक पदासाठी 347 अर्ज दाखल झाले असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











