pratik patil news : कामेरी, येडेनिपाणी व शिवपुरी येथील ऊस उत्पादक शेतकर्यांशी संवाद : आपल्या कृषिप्रधान देशात शेती व शेतकर्यांच्या प्रगतीवर अधिक लक्ष देणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही. या परिस्थितीत आपण एकमेकांच्या हातात- हात घालून आपल्या समोरील आव्हानांना सामोरे जात नव्या प्रगतीचा आरंभ करायला हवा,अशी भावना राजारामबापू पाटील सह कारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी शेतकरी संवाद संपर्क दौर्यात बोलताना व्यक्त केली.
pratik patil news : कामेरी, येडेनिपाणी व शिवपुरी येथील ऊस उत्पादक शेतकर्यांशी संवाद
प्रतिकदादा पाटील कामेरी,येडेनिपाणी व शिवपुरी येथील ऊस उत्पादक शेतकर्यांशी संवाद करून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित पाटील,सुनिल पाटील,छगन पाटील,डॉ. रणजित पाटील,माजी पं.स.सदस्य आनंदराव पाटील,सरपंच शामबाला माळी,उपसरपंच प्रताप पाटील,डॉ.सचिन पाटील,कल्लाप्पा पोचे,उपसरपंच शामराव माने,संचालक प्रताप पाटील,शैलैश पाटील,राजकुमार कांबळे, हणमंत माळी,डॉ.सौ.योजना शिंदे-पाटील या दौर्यात सहभागी झाले होते.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,आपण माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली शेतकर्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. आपण या योजनांचा लाभ घ्यावा. आपण आज ज्या विविध अडी-अडचणी मांडल्या आहेत,त्यांचा पाठपुरावा करून त्या नक्की सोडविल्या जातील.
याप्रसंगी रणजित पाटील,मकरंद पाटील, कल्लाप्पा पोचे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संचालक प्रताप पाटील,शैलेश पाटील, डॉ.सौ.योजना शिंदे-पाटील,सचिव डी.एम. पाटील,ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील यांनी कारखान्याच्या योजनांची माहिती दिली.
pratik-patil-news-conversation-with-sugarcane-farmers-from-kameri-yedenipani-and-shivpuri
यावेळी एम.के.जाधव,विकास पाटील, विकास माने,भगवान पाटील,नागनाथ रास्कर,भिमराव माने,आकाराम पाटील, नारायण पाटील,रविंद्र पाटील,दूध संघाचे संचालक विकास कांबळे,बाजार समितीचे संचालक सी.एच.पाटील,रायसिंग पाटील, राजाराम पाटील,एस.आर. पाटील,सुकुमार शेवाळे, सुनिल खट्टे,एस.डी.खोत, शशिकांत भक्ते, रामचंद्र खोत,लिंगराज कमाने,तसेच सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, इरिगेशन आँफिसर जे.बी.पाटील,गटाधिकारी संग्राम पाटील, विकास कदम यांच्यासह ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











