raju shetti on madhuri elephant news : अनंत अंबानीच्या अंटालियासमोर ठाण मांडणार : राजू शेट्टी यांचा इशारा

SHARE:

raju shetti on madhuri elephant news : अनंत अंबानीच्या अंटालियासमोर ठाण मांडणार : राजू शेट्टी यांचा इशारा : राज्य सरकारकडून माधुरी हत्ती नांदणी मठामध्ये परत करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करूनही याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिसाद मिळत नाही. न्यायव्यवस्था व राज्य सरकार दोघेही चालढकल करत असल्याचा संशय वाटू लागला आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास लवकरच वनताराचे प्रमुख अनंत अंबानीच्या अंटालिया समोर ठाण मांडून बसणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

raju shetti on madhuri elephant news : अनंत अंबानीच्या अंटालियासमोर ठाण मांडणार : राजू शेट्टी यांचा इशारा

सोमवारी सकाळी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीच्या विनंतीसाठी राजू शेट्टी स्वत: तिस-यांदा हजर होते. गेल्या महिन्याभरापासून माधुरी हत्ती परत करण्याबाबत राज्य सरकारकडून विविध मार्गानी हालचाली करण्यात येत आहेत. पेटा व वनविभागाला हाताशी धरून वनताराने बेकायदेशीर रित्या माधुरी हत्तीला वनतारा येथे घेऊन गेले आहेत. नांदणी मठामध्ये 600 वर्षापासून हत्ती पाळण्याची संस्कृती आहे.

देशामध्ये तीन हजार पाळीव हत्ती असून वर्षानुवर्षे हे हत्ती परंपरागत वंश पंरपरेने पाळले जात आहेत. या हत्तींची चांगल्या पध्दतीने संगोपन केले जात असून पेटासारख्या तथाकथित प्राणीमित्र संघटनाकडून चुकीचे कागदपत्रे व पुरावे तयार करून सर्व हत्ती वनतारा येथे सोडण्यात येत आहेत.

गेल्या महिन्याभरात सर्वोच्च न्यायालयात तीन वेळा हेलपाटे मारले. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री यांचेशी झालेल्या बोलण्याप्रमाणे आज सकाळी सरकारी वकील सिध्दार्थ धर्माधिकारी यांनी दुस-यांदा मा. न्यायालयासमोर अवगत करूनही हत्ती पुर्ववत नांदणी मठामध्ये स्थलांतरित करण्यासाठी न्यायमुर्ती यांचेकडून प्रकरण गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसून येवू लागले आहे.

नांदणी मठामध्ये चातुर्मासाचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. सदर कार्यक्रमामध्ये माधुरी हत्तीचा मान असतो. यामुळे उच्च स्तरीय समितीने मठाच्या कार्यक्रमास हत्ती घेऊन जाण्यास परवानगी दिली असून तोच निर्णय मा. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेला आहे. यामुळे सदर दिलेल्या निर्णयाप्रमाणे शासनाने पहिल्यांदा मठातील सुरू असलेल्या कार्यक्रमास हत्ती पाठवावा व न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *