rajyasabha election : शरद पवारच राज्यसभेचे उमेदवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा

SHARE:

काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा

rajyasabha election : शरद पवारच राज्यसभेचे उमेदवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वतः शरद पवार येण्याची शक्यता कमी असून, विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून, काँग्रेसकडून ते जाहीर करण्यता आलं आहे.

rajyasabha election : शरद पवारच राज्यसभेचे उमेदवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा

संजय राऊत यांनीही ट्विट करुन महाविकास आघाडी एक राहिल, असे म्हणत शरद पवारांच्या नावासा पाठिंबा असल्याचे सूचवले आहे. त्यामुळे, शरद पवार हेच महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या गुरूवारी शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीकडून कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ कमी असतानाही ज्येष्ठ नेते म्हणून दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांच्या नावाची घोषणा केली, तसेच काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे आणि उद्धव ठाकरेंसह शिवसेना पक्षाचे आभार मानले आहेत.

अधिकारी सिल्व्हर ओकवर जाणार, आज अर्ज भरणार

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे शरद पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सभागृहात येणार नाहीत. त्यामुळे, कदाचित विधिमंडळातील अधिकारी शरद पवार यांना सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन उमेदवार अर्ज भरतानाची गोपनियेतीची शपथ देण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

भाजपकडून 4 नावे जाहीर

राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उरला असून, सर्वच राजकीय पक्षांकडून नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून महाराष्ट्रातील 4 जागांसाठी 4 नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे नेत विनोद तावडे, रिपाइंचे रामदास आठवले यांच्यासह नागपूरच्या नगरसेवक माया ईवनाते आणि परभणीचे रामराव वडकुतेंना भाजपने संधी दिली आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान, मविआकडून तिन्ही पक्षांमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू असताना शरद पवारांचं नाव जवळपास आज जाहीर करण्यात आल्याने शरद पवार पुन्हा दिल्लीला जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक

राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून 6, बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, आसामधून 3, तेलंगाणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *