sangli crime news : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी लाटवडेच्या तरूणावर सांगलीत गुन्हा दाखल.

SHARE:

 sangli crime news : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी लाटवडेच्या तरूणावर सांगलीत गुन्हा दाखल. : मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित गजानन काकासाहेब हजारे (रा. लाटवडे, वडगाव, ता. हातकणंगले) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

sangli crime news : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी लाटवडेच्या तरूणावर सांगलीत गुन्हा दाखल.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित गजानन हजारे आणि मिरज तालुक्यातील एका गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या मुलीची ओळख झाली होती. दि. १६ रोजी संशयित गजानन मुलीच्या गावात तिला भेटायला आला. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास एका मंदिराजवळ दोघे भेटले.
https://youtu.be/aydO0onpvco?si=qygK3RQ6pKxA056e
तेव्हा गजानन याने तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करूया असे सांगितले. मुलीने तिचे वय पूर्ण नाही, तसेच दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्याचे सांगितले. परंतू गजानन याने तिचे काही न ऐकता हाताला धरून दुचाकीवर जबरदस्तीने बसवले. तेथून वडगाव येथे नेले. दरम्यान पिडित मुलगी घरात नसल्याचे पाहून शोधाशोध सुरू झाली. पिडित मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्यानंतर त्यांनी लाटवडे गाव गाठले. तेथे गजाननच्या घरातील लोकांना जाब विचारला.
तोपर्यंत गजानन आणि पिडित मुलगी घाबरून वडगाव पोलिस ठाण्यात हजर झाले. नातेवाईकांनी तेथे जाऊन मुलीला ताब्यात घेतले. मुलीने सांगितलेल्या माहितीवरून तिच्या आईने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गजानन हजारे याच्याविरूद्ध मुलीचे अपहरण, विनयभंग आणि ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *