sangli election news : निष्ठेचा वारसा कि सत्तेची लालसा? प्रभाग 14 चा फैसला कोणाच्या बाजुने : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा गावभाग केवळ राजकीय ताकदीपुरताच मर्यादित नाही; तर संस्कृती, समाजकार्य आणि क्रीडाक्षेत्रातील गौरवशाली परंपरेचा वारसा मिरवणारा भूभाग आहे. बिजलीमल्ल संभाजी पवारांच्या परंपरेने घडलेला हा प्रभाग म्हणजे संघर्ष, शिस्त आणि निष्ठेचा इतिहास!
sangli election news : निष्ठेचा वारसा कि सत्तेची लालसा? प्रभाग 14 चा फैसला कोणाच्या बाजुने
आणि याच बालेकिल्ल्यात यंदा राजकारणाची ठिणगी पडली आहे-हाय होल्टेज लढत पेटली आहे!
एका बाजूला भाजपचे निष्ठावान, तळागाळातील कार्यकर्ते विजय साळुंखे, तर दुसर्या बाजूला शिवसेनेचा धनुष्यबाण खांद्यावर घेतलेले माजी उपमहापौर युवराज बावडेकर-ज्यांचा राजकीय प्रवासच मुळात भाजपच्या छायेत घडलेला!
कालपर्यंत कमळ हातात असलेले युवराज बावडेकर, आज शिवसेनेचा झेंडा फडकावत मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे पृथ्वीराज पवार आणि गौतम पवार यांनी भाजपची मशाल विजय साळुंखे यांच्या हाती देत, निष्ठेची कास धरली आहे.
ही केवळ निवडणूक नाही-ही निष्ठा विरुद्ध सत्ताकांक्षा अशी थेट लढाई आहे!
युवराज बावडेकर हे संभाजी पवारांचे कट्टर निष्ठावान बटू बावडेकर यांचे चिरंजीव. आप्पांच्या तालमीत घडलेले, राजकारणाचे धडे गिरवलेले. नगरसेवक झाले, उपमहापौर झाले. परंतु राजकारणात कायमचा कुणाचाच ठेका नसतो, हेच यंदा पुन्हा अधोरेखित झाले आहे.
आज पवार गट आणि बावडेकर गट आमनेसामने ठाकले आहेत. माजी निष्ठा, जुने ऋणानुबंध आणि सध्याची राजकीय समीकरणे-सगळंच पणाला लागलं आहे! एकंदरीत काय, तर संपूर्ण महापालिका क्षेत्रात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला प्रभाग क्रमांक 17 हा यंदा केवळ निवडणूक लढत नाही,
तर प्रतिष्ठेची, वारशाची आणि निष्ठेची निर्णायक रणभूमी ठरली आहे!
इथे विजय फक्त मतांचा नाही-इतिहास आणि भविष्याचा फैसला होणार आहे!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











