sangli news : विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी शाळेच्या संस्थेसह तिघांवर गुन्हा : जलतरण तलावात पोहोताना बुडून झाला होता मृत्यू.

SHARE:

sangli news : विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी शाळेच्या संस्थेसह तिघांवर गुन्हा : जलतरण तलावात पोहोताना बुडून झाला होता मृत्यू. : शहरातील शिंदे मळा परिसरात आलेल्या अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कुल मध्ये शनिवारी दुपारी जलतरण तलावात बुडून आदित्य विकास ओलेकर (वय १२) याचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी संस्थेसह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

sangli news : विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी शाळेच्या संस्थेसह तिघांवर गुन्हा : जलतरण तलावात पोहोताना बुडून झाला होता मृत्यू.

या प्रकरणी मृत आदित्यचे वडील विकास ओलेकर यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शिक्षण संस्था, जलतरण तलावाची जबाबदारी असलेल्या दीपक सदलगे, विजय कांबळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील आदित्य ओलेकर याला वडील विकास ओलेकर यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये सहावीच्या वर्गात दाखल केले होते. शाळेत दाखल करताना त्यांनी आदित्यला पाेहायला येत नसल्याबद्दल सांगितले होते.

दि. १ जूनपासून शाळा सुरू झाली होती. शनिवारी सायंकाळी आदित्यला इतर मुलांबरोबर जलतरण तलावात पोहायला नेले होते. आदित्यला पोहता येत नसल्याचे सांगून सुद्धा त्याला तलावात सोडल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शाळा प्रशासन, जलतरण तलावाची जबाबदारी असलेले दीपक सदलगे, विजय कांबळे यांच्या निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे आदित्यचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानुसार संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

संजयनगर पोलिसांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेतली. मृत आदित्यचे वडील विकास ओलेकर यांची फिर्याद नोंदवून घेतली. शाळा, सदलगे आणि कांबळे या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. संजयनगरचे पोलिस निरीक्षक सतीश कदम हे तपास करत आहेत. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा