sangliwadi news : आरक्षणाचा वारा आणि सांगलीवाडीचा धक्का! : सांगलीच्या इतिहासात नेहमीच झळकणारे नाव — सांगलीवाडी. या भागाचा राजकीय ठसा जसा भक्कम, तसाच इथल्या मतदारांचा आत्मसन्मानही दणकट. पण यंदा महापालिकेच्या रणांगणात आरक्षणाचा असा वारा सुटला की, अनेक मातब्बरांची पावलेच डगमगली आहेत.
sangliwadi news : आरक्षणाचा वारा आणि सांगलीवाडीचा धक्का!
आयर्विन पुलाकडील प्रभाग क्रमांक 13 मध्ये यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी दोन जागा आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी एक जागा राखीव पडली आहे. म्हणजेच या वेळी सांगलीवाडीच्या राजकारणात “पुरुषांच्या तोफा शांत, पण रणनीती सक्रिय” असा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
सांगलीवाडीच्या प्रत्येक गल्लीमध्ये पाटील घराण्यांचा प्रभाव आजवर जाणवला आहे. माजी आमदार दिनकर पाटील यांनी या भूमीला राजकीय ओळख दिली, तर अजिंक्य पाटील, हरिदास पाटील, दिलीप पाटील, अशोक पाटील, महाबळेश्वर चौगुले, उदय पाटील यांसारख्या अनेकांनी गेल्या आठ वर्षांपासून मेहनतीने तयारी केली. परंतु, यंदाच्या आरक्षणाच्या निकालाने या सर्वांच्या स्वप्नांवर जणू कुणीतरी “आरक्षणाचे झाकण” ठेवल्यासारखे झाले आहे.
आता या मातब्बर नेत्यांना राजकारणातील आपला वारसा पुढे नेण्यासाठी “सौं” वर विश्वास ठेवावा लागणार आहे.
म्हणजेच यावेळी सांगलीवाडीतील ‘पाटील’ परिवार महिलांच्या माध्यमातून महापालिकेच्या गादीवर पाऊल ठेवणार.
सांगलीवाडीने आजवर अनेक दिग्गज नगरसेवक घडवले —
दिनकर पाटील यांच्या रूपाने आमदार, अजिंक्य पाटील आणि हरिदास पाटील यांच्या रूपाने स्थायी समिती सभापती… पण यंदा चित्र वेगळे आहे.
पुरुष नेतृत्वाला आता थोडे मागे राहून महिलांना पुढे करावे लागणार आहे.
आणि कदाचित,
हीच वेळ असेल सांगलीवाडीच्या राजकारणात “स्त्रीशक्तीचा सुवर्णयुग” सुरू होण्याची.
कारण, सांगलीवाडीचा इतिहास सांगतो —
“येथील ध्येय, जिद्द आणि नेतृत्व कोणाचेही असो… पण प्रत्येक निर्णय या मातीतूनच उगम पावतो!”
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











