savalwadi crime news : सावळवाडीत झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने कापून केली चोरी

SHARE:

savalwadi crime news : सावळवाडीत झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने कापून केली चोरी :  मिरज तालुक्यातील सावळवाडी येथे घरामध्ये सर्व झोपलेले असताना घराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश करत महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र कापून चोरल्याची घटना उघडकीस आली.

savalwadi crime news : सावळवाडीत झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने कापून केली चोरी

सदर चोरीची घटना ही बुधवार दि. 22 ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सौ. संगीता विष्णू शिरतोडे (वय 45 रा. सावळवाडी) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगीता शिरतोडे या आपल्या कुटुंबीयांसह मिरज तालुक्यातील सावळवाडी परिसरात राहतात. मंगळवारी रात्री घरातील सर्वजण जेवणकरून झोपले होते. यावेळी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास 35 ते 40 वयोगटातील अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश केला.

यावेळी घरात झोपलेल्या संगीता शिरतोडे यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र कापून चोरट्याने पलायन केले. पहाटेच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास येताच संगीता शिरतोडे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, गावामध्ये घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेनं गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *