rajkiyalive

VIRACHARYA BABASAHEB KUCHNURE :वीराचार्य पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपुरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन

जयसिंगपूर : जनप्रवास

VIRACHARYA BABASAHEB KUCHNURE :वीराचार्य पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपुरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन : गुरुकुल शिक्षण प्रणालीचे प्रणेते गुरूदेव समंतभद्र महाराज व युवकांचे प्रेरणास्थान असलेले वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांची 36 व्या पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपूर येथे शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भव्य अहिंसा, शाकाहार व व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आचार्य श्री चंद्रप्रभूसागरजी महाराज व स्वागताध्यक्ष आणि आम. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

VIRACHARYA BABASAHEB KUCHNURE :वीराचार्य पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपुरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन

युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन व अध्यात्माची विशिष्ट छाप सोडणारे एक प्रभावी अध्यात्मिक संत युवासम्राट प.पू.108 आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराज व संघस्थ सरलसागरजी महाराज यांचा पावन चातुर्मास येथील पार्श्वनाथ दि.जैन मंदिर चौथी गल्ली येथे सुरू आहे. त्यांच्याच मंगल सानिध्यामध्ये या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली जिनमंदिरापासून सुरू होवून शहरातील प्रमुख मार्गावरून ही भव्य मिरवणुक निघणार आहे. यामध्ये 24 घोडे, 24 रथ, चित्र रथ, पारंपारिक वाद्य, बँड, बँजो, झांजपथक आदिंचा समावेश असणर आहे.

पंचकल्याण पुजेतील मानाचा हत्ती बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर

सदर मिरवणुकीची सांगता श्री सिध्देश्वर मंदिर, गल्ली नं.4 येथील पटांगणावरील भव्य सभामंडपामध्ये हा पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार आहे. या भव्य रॅली व पुण्यतिथी सोहळ्यास पंचकृषीतील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती युवासम्राट प.पू.108 आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराज व या पुण्यतिथी सोहळ्याचे स्वागताध्यक्ष व जिनमंदिर ट्रस्ट अध्यक्ष आमदार व माजी आरोग्यराज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज