ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
zp election news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा: गेल्या 7 वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालायने नव्या प्रभार रचनेसह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
zp election news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणार्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. त्यामुळे, आता लवकरच राज्यातील निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. दरम्यान, आधी झेडपी अन् पंचायत समितींच्या निवडणुका होतील, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणासंदर्भातील या निकालाचे दोन अर्थ आहेत. मागील निर्णयात जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्या असे न्यायालयाने सांगितले होते, तेच डायरेक्शन आता कन्फर्म झाले आहे.
त्यामुळे ओबीसी आरक्षण पूर्णपणे या निवडणुकीत राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच निवडणूक होतील. त्यामुळे, राज्य सरकारच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
आधी झेडपी अन् पंचायत समिती निवडणूक
राज्यातील नगरपालिका महानगरपालिका यांच्या प्रभाग रचनांचे काम जवळपास पूर्ण झाले असून 6 तारखेला राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे हे दाखल करतील. पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नंतर नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका यांच्या निवडणुका घेतल्या जातील, असा अंदाज असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल आल्यानंतर संजय शिरसाट यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
औसा येथून याचिका
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य शासनाने नवीन प्रभाग रचना 10 जून 2025 रोजी जारी केली होती. त्यानुसार या नवीन प्रभाग रचना पूर्ण होण्यासाठी 110 दिवसांचा वेळ लागणार होता. सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याबाबत 6 मे 2025 रोजी आदेश दिला होता. मात्र, नवीन प्रभाग रचनेला वेळ लागणार असल्यामुळे नवीन प्रभाग रचना संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली होती.
zp-election-news-the-way-is-clear-for-local-body-elections
नवीन प्रभाग रचनेला जास्त वेळ लागत असल्याने लवकरात लवकर निवडणुका होण्यासाठी नगरपालिकेची जुनी प्रभाग रचना होती, त्या जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्यात याव्यात, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून औसा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी ही याचिका दाखल केली होती.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










