rajkiyalive

SANGLI : कवठेपिरानमधील सुरज पाटील टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

सांगली : SANGLI : कवठेपिरानमधील सुरज पाटील टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार  खून करुन पुरावे नष्ट करणे, हाणामारी करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असणारी मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथील सुरज पाटील टोळीस सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले. टोळीत दोन सदस्य आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी केली. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये सुरज संभाजी पाटील (वय 29) आणि अक्षय नामदेव पाटील (वय 27, दोघेही रा. कवठेपिरान, ता. मिरज ) यांचा समावेश आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

SANGLI : कवठेपिरानमधील सुरज पाटील टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित सूरज पाटील टोळीने सन 2017 ते 2022 या कालावधीत दहशत निर्माण केली होती. खून करुन पुरावा नष्ट करणे, शिवीगाळ, मारहाण, गांजाची विक्री करणे, आदींसह अन्य गुन्हे टोळीतील दोन सदस्यांवर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये ग्रामीण पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांनी पोलीस अधिक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी हा उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

गुन्हयांचा अहवाल आदी विचारात घेवून पोलीस अधिक्षकांनी टोळीवर हद्दपारीची कारवाई केली.

सदर चौकशी अहवाल, टोळीविरोधात दाखल असलेल्या गुन्हयांचा अहवाल आदी विचारात घेवून पोलीस अधिक्षकांनी टोळीवर हद्दपारीची कारवाई केली. यामध्ये अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोखर, स्थानिक गुन्हे अन्वषणचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेश रामाघरे, पोलीस उपनिरिक्षक सिध्दाप्पा रुपनर आदींसह अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.

भरधाव दुचाकीची रस्ता ओलांडणार्‍या महिलेला धडक : तरुणावर गुन्हा दाखल.

सांगली : शहरातील विजयनगर चौक येथे रिक्षा मधून उतरून रास्ता ओलांडणार्‍या महिलेला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्या. सदरचा अपघात हा मंगळवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी जखमी सुजाता तुकाराम ढेरे (वय 46 रा. शाहूनगर, तासगाव) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक आदित्य नागेश तेलगू (रा. कुपवाड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी सुजाता ढेरे या आपल्या कुटुंबियांसह तासगाव शहरात राहतात. मंगळवार दि. 27 फेब्रुवारी रोजी कामानिमित्त त्या विजयनगर येथे आल्या होत्या. यावेळी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास विजयनगर चौक येथे रिक्षामधून उतरून त्या रस्ता ओलांडत होत्या. यावेळी संशयित नागेश तेलगु हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (क्र, एमएच 10 ईआर 4289) हि भरधाव वेगात घेऊन आला. त्याने ढेरे यांना जोराची धडक दिली. या अपघातात ढेरे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णायालात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार आदित्य तेलंगु याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज