rajkiyalive

1951 : पहिल्याच लोकसभेत रत्नाप्पा कुंभारांची बाजी

dineshkumar aitawade 9850652056
मुंबई प्रांतातून एकूण 45 जागा निवडून द्यायच्या होत्या. कोल्हापूर कम सातारा या जागेवरून दोन उमेदवार निवडून द्यायचे होते. अखिल भारतीय काँग्रेसकडून रत्नाप्पाण्णा कुंभार आणि कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांना तिकीट मिळाले. त्यांच्या विरोधात इतर पक्षातून बाळासाहेब हणमंतराव खर्डेकर, राजाराम रामजी भोले, संतराम नानासाहेब माने, वसंतराव खांडेराव बागल आदींनी उमेदवारी अर्ज भरला. सहापैकी दोन जागा निवडायच्या होत्या. यामध्ये अपक्ष उमेदवार बाळासाहेब हणमंतराव खर्डेकर यांना 223056 तर काँग्रेसच्या रत्नाप्पाण्णा कुं भार यांना 163505 मते मिळवून विजयी झाले.

1951 : पहिल्याच लोकसभेत रत्नाप्पा कुंभारांची बाजी

कोल्हापूर कम सातारा लोकसभा मतदार संघ

1951 मध्ये तर अत्यंत वेगळीच स्थिती होती. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे भारत नुकताच इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला होता पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली होती आणि भारत लोकशाहीप्रधान देश झाला होता. लोकशाही असल्याने लोकांनी देश चालवण्यासाठी खासदार आणि आमदार निवडून देणे बंधनकारक होते. भारत एवढा मोठा देश, नुकताच रांगू लागलेला होता आणि अशा स्थितीत संपूर्ण देशात मतदान घेणे खायची गोष्ट नव्हती.

त्यातही फक्त केंद्र सरकारसाठी खासदारांचीच निवड करायची होती असे नाही तर देशातील राज्यांसाठी आमदारही निवडायचे होते. मतदारांची नोंद कशी करायची? मतदान केंद्र कशी उभी करायची? मतपत्रिका ठेवण्यासाठी लागणार्‍या मोठ्या पेट्या कशा आणायच्या, त्याची सुरक्षा कशी करायची? मतदान घेण्याासाठी लागणारे मनुष्यबळ कसे निवडायचे, त्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे? अशा एक ना अनेक गोष्टींबाबत भारतातील नोकरशाहीला माहिती नव्हती. या सगळ्या गोष्टींचा प्रथमच विचार करून त्या तयार करायच्या होत्या. त्यातच भारतातील निरक्षरांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती.

अजून प्रांतरचना झाली नव्हती. त्यामुळे दक्षिण सातारा जिल्ह्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचा समावेश होता. मुंबई प्रांतामध्ये या सर्व जिल्ह्यांचा समावेश होता. देशातील पहिल्या लोकसभेसाठी निवडणुका लागल्या. संपूर्ण देशभरात 14 राष्ट्रीय पक्षांनी या निवडणुकीत भाग घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय काँग्रेस, भारतीय जनसंघ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, फॉरवॅर्ड ब्लॉक, किसान मजदूर प्रजा पार्टी आदी महत्वाच्या पक्षांचा समावेश होता.

मुंबई प्रांतातून एकूण 45 जागा निवडून द्यायच्या होत्या. कोल्हापूर कम सातारा या जागेवरून दोन उमेदवार निवडून द्यायचे होते. अखिल भारतीय काँग्रेसकडून रत्नाप्पाण्णा कुंभार आणि कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांना तिकीट मिळाले. त्यांच्या विरोधात इतर पक्षातून बाळासाहेब हणमंतराव खर्डेकर, राजाराम रामजी भोले, संतराम नानासाहेब माने, वसंतराव खांडेराव बागल आदींनी उमेदवारी अर्ज भरला. सहापैकी दोन जागा निवडायच्या होत्या. यामध्ये अपक्ष उमेदवार बाळासाहेब हणमंतराव खर्डेकर यांना 223056 तर काँग्रेसच्या रत्नाप्पाण्णा कुं भार यांना 163505 मते मिळवून विजयी झाले.

बाळासाहेब हणमंतराव खर्डेकर हे मूळचे कोल्हापूरचे. 1 ऑगस्ट 1903 रोजी जन्मलेल्या खर्डेकर यांनी बॉम्बे युनिर्व्हसिटीमधून उच्च शिक्षण घेतल होते. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये काही काळ त्यांनी प्रिन्सिपल म्हणूनही काम केले. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी पहिल्या लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी भरली. लोकांनीही त्यांना भरभरून साथ दिली. अशा तर्‍हेेने बाळासाहेब खर्डेकर यांच्या रूपाने कोल्हापूरला पहिल्यांदाच उच्चशिक्षित खासदार मिळाला.

काँग्रेसने उभा केलेल्या थोर स्वातंत्र्यसेनानी रत्नाप्पाण्णा कुंभार यांनीही मोठे मतदान घेवून विजयी झाले. 15 सप्टेंबर 1909 रोजी जन्मलेल्या रत्नापाण्णा कुंभार यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. पहिल्या लोकसभेला देशभरातून अनेक स्वातंत्र्यसैनिक निवडणुकीसाठी उभे राहिले होते. कुंभारही त्यापैकीच एक होते. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. पुढे 1962 ते 1982 आणि 1990 ते 1998 मध्ये त्यांनी विधानसभेत शिरोळ मतदार संघांचे प्रतिनिधीत्व केले. ज्येष्ठ सहकारी नेते म्हणून त्यांचा राज्यात नावलौकिक होते.

अशा तर्‍हेने दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर कम सातारा या लोकसभा मतदार संघात रत्नाप्पा कुंभार आणि बाळासाहेब खर्डेकर यांनी पहिल्या लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज