ncp ajit pawar news : राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाची मागणी; कोणाला मिळणार संधी : राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आधीपासूनच मवाळ भूमिका घेणार्या अजित दादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळण्याची ही शक्यता आहे.
ncp ajit pawar news : राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाची मागणी; कोणाला मिळणार संधी
यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवा चेहर्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असून, अशी माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. त्यामुळे या पदावर आता कुणाची वर्णी लागते ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. असे असताना निकाल जाहीर होऊन आज चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांना पडला आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
अजित पवार
धनंजय मुंडे
अदिती तटकरे
अनिल पाटील
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम
छगन भुजबळ
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.