bandhakam kamgar news : बांधकाम कामगार नोंदणीत ‘बोगस’गिरी

SHARE:

जिल्ह्यात बांधकाम कामगारांचे अक्षरशः पेव फुटले आहे. एजंट, दलालांच्या माध्यमातून अनेक बोगस कामगारांच्या नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे एजनतांमध्ये राजकीय पक्ष, संघटनाच्या पदाधिकारी, नेत्यांच्या चेल्यांचा अधिक भरणा असून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी 1 हजार रुपयांपासून 2200 रुपये उकळले जात आहेत. दरम्यान गेल्या दोन वर्षातील बांधकाम कामगार नोंदणी संशयास्पद असून मंडळाकडून निश्चित माहिती दिली जात नाही. सांगलीतील कामगार मंडळ संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

bandhakam kamgar news : बांधकाम कामगार नोंदणीत ‘बोगस’गिरी

एजंट, दलाल, अधिकार्‍यांची चलती ः मंडळाचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात ः चौकशीची गरज

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांचे राहणीमान उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांची नोंदणी करून पात्र कामगारांना विविध लाभ देण्यात येत आहेत. त्यात शैक्षणिक साहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, आर्थिक साहाय्य आदी योजनांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या दोन – अडीच वर्षात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ भलतेच चर्चेत आले आहे. राज्यात सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून या मंडळाची ख्याती होती. मात्र आता हे मंडळ डबघाईला आले आहे. गेल्या दोन वर्षात मंडळांच्या कामकाजामध्ये अधिक गतिमानता आली आहे.

विशेतः विधानसभा निवडणुकीपूर्वी मंडळ अधिक सक्रिय झाले. भाजपा, शिवसेना, राष्टवादीसह अन्य सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या चेल्यांनी या मंडळाचा अक्षरा ताबाच घेतला आहे. नव्याने एजंट, दलाल निर्माण झाले आहेत. गावांगावांमध्ये बांधकाम कामगार नोंदणीची शिबीर थाटली जात आहेत. प्रत्येक नोंदीसाठी एक हजार रुपयांपासून 2200 रुपयांपर्यंत पैसे उकळले जात आहेत. वास्तविक बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे असतील तर केवळ 50 रुपयांचा खर्च येतो. मात्र बोगस नोंदणी करण्यासाठी लाभार्थीही सढळ हाताने दलालांना पैसे देत आहेत. त्यामुळे दलालाबरोबर अधिकार्‍यांचे खिसे भरु लागले आहेत.

ज्या एजंटाचे पैसे, त्यांच्याच लाभार्थ्यांना संसार साहित्य तसेच संरक्षण साहित्यांचे किट दिले जाते.

एखाद्याने सामाजिक भावनेने बांधकाम कामगार नोंदणी केली असेल तर त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. कुपवाड एमआयडीसीमध्ये मंडळाची तीन गोदामे आहेत. इथेही सावळा गोंधळ सुुर आहे. एका राजकिय पक्षाशी संबधित माजी मंत्र्याच्या चेल्यांनी या गोदामांचा ताबा घेतला आहे. आधी हिशोब, मगच भांडी आणि संरक्षण सहित्य किट असा अघोषित कायदाच या मंडळींनी ईथे सुरु केला आहे. लाभार्थ्यांचे फोन न उचलने, वारंवार हेलपाटे मारायला लावणे असा एककलमी कार्यक्रम त्यांनी सुरु केला आहे. त्यामुळे गोरगरीब बांधकाम कामगारांपेक्षा बोगस कामगारांनाच या योजनांचा अधिक फायदा मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

मंडळाच्या जबाबदार अधिकार्‍यांना सुरु असलेल्या या बाजाराची माहिती नाही असे म्हणने धाडसाचे ठरणार आहे.

राजकिय नेत्यांचा सुरु असलेला हा नंगानाच अधिकार्‍यांनी सोयिस्कररित्या दुर्लक्षित केला आहे. परिणामी मंडळाची प्रचंड मोठी आर्थिक लुबाडणूक होत आहे. प्रत्येक भांडी, पेटी सेट मागे गोदामधील कर्मचारी 450 रुपये घेत असल्याच्या तक्रारी आहेत. ऐवढे पैसे दिल्याशिवाय सेट दिले जात नाहीत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना तात्काळ तर ज्यांच्याकडे नाहीत त्यांना सेट नसल्याचे सांगितले जाते. राजकिय वरदहस्त असल्याने येथील कर्मचारी माजले आहेत. नागरिकांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. तुम्ही काहीही करा, आमच्यावर कारवाई होत नाही, अधिकार्‍यांनाही पैसे दिले जातात असे धाडसाने येथील कर्मचारी सांगतात.

दोन वर्षात किती नोंदणी, माहिती नाही

दरम्यान गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात मंडळाच्या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांची नोंद करण्यात आली आहे. यासाठी एजंट, दलालांचा मोठा वाटा आहे. यातून अनेक दलाल, एजंटांनी कोट्यवधींची माया जमवली आहे. अधिकारीही मालामाल झाले आहेत. गोदामावर काम करणारे कर्मचारी दीड-दोन लाखांच्या नव्या कोर्‍या दुचाकी घेऊन फिरत आहेत. या कर्मचार्‍यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी आता होत आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षात नेमकी किती बांधकाम कामगारांची नोंदणी झाली, याची माहिती मंडळाकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *