pratik patil islampur news : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन

SHARE:

pratik patil islampur news : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन :  सांगली जिल्ह्याचे युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.१८ जुलै 2०२५ रोजी इस्लामपूर येथे भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्पर्धेचे संयोजन केले जात आहे. स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालया समोर सकाळी ९ वाजता होणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी दिली.

pratik patil islampur news : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन

    या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास रुपये ५१ हजार,दुसऱ्या विजेत्या संघास रुपये ३१ हजार,तिसऱ्या विजेत्या संघास रुपये २१ हजार व चौथ्या विजेत्या संघास रुपये ११ हजार रोख रक्कम बक्षीस दिले जाणार आहे.
प्रत्येक संघात ८ खेळाडू हवेत,ही स्पर्धा नॉक आउट किंवा लीग पध्दतीने खेळविली जाईल, संघातील खेळाडू हा त्या-त्या बूथमधीलच हवा आणि पंचांचा निर्णय सर्वाना बंधन कारक असेल.
     इच्छुक संघांनी गुरुवार दि.१७ जुलै २०२५ पूर्वी इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात नांवे नोंद करावीत,असे संयोजकांनी आवाहन केले आहे. सचिन कोळी,अभिजीत पाटील,राजेंद्र बाणेकर, रणजीत गायकवाड,स्वरूप मोरे,दिग्विजय पाटील,धीरज भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.
pratik-patil-islampur-news-tug-of-war-competition-organized-on-the-occasion-of-pratikdada-patils-birthday
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *