jayant patil news :राजारामबापू बँक इस्लामपुरात उभारणार आण्णाभाउ साठेंचा पुतळा

SHARE:

jayant patil news : राजारामबापू बँक इस्लामपुरात उभारणार आण्णाभाउ साठेंचा पुतळा : राजारामबापू सहकारी बँकच्या माध्यमा तून इस्लामपूर येथील न्यायालयासमोरील मुख्य चौकात (आयलँडच्या जागेवर) लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा दिमाखदार पुतळा उभा करू,अशी घोषणा माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे केली. आ.पाटील यांनी आज (शुक्रवार) सकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यां शी चर्चा करून हा निर्णय जाहीर केला.

jayant patil news : राजारामबापू बँक इस्लामपुरात उभारणार आण्णाभाउ साठेंचा पुतळा

मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने जयंती महोत्सव समिती स्थापन करून जयंतीच्या रात्री कचेरी चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आज 8 व्या दिवशी गोड समारोप झाल्याने कार्यकर्त्यांनी आ.जयंतराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व एकमेकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला.

तहसिलदार सचिन पाटील,राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,खंडेराव जाधव, दादासाहेब पाटील,अरुण कांबळे,अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे डॉ.विजय चांदणे,शंकरराव महापुरे,प्रा.डॉ.सुभाषराव वायदंडे,डॉ.सुधाकर वायदंडे,नंदकुमार नांगरे, संदीप पाटोळे,उत्तम चांदणे,विनोद बल्लाळ, विकास बल्लाळ,टक्कर आंदोलनात जखमी झालेले रामभाऊ देवकुळे,बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण,तसेच दलित समाज व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आ.पाटील म्हणाले,राजारामबापू सहकारी बँक आजच नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यां ना पत्र देईल. त्यांच्या मंजूरीनंतर बँक आपणा सर्वांना विश्वासात घेऊन स्वनिधीतून हा पुतळा उभा करेल. त्यासाठी वर्गणी अथवा कोणाकडे हात पसरणार नाही. पूर्वी आपल्या कडे नगरपालिकेची सत्ता होती,त्याकाळात आपण कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे. अण्णाभाऊ साठे हे आपल्या तालुक्याचे भूषण आहेत,ते तुमचे- आमचे दैवत आहेत. त्यांच्या नांवलौकिकास साजेसा पुतळा उभा करू. वाळवा तालुक्या तील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात योगदान केले आहे. हाच क्रांतीकारी वारसा जपत आपण जो लढा उभा केला आहे,तो कौतुकास्पद आहे.

यावेळी तहसिलदार सचिन पाटील यांनी आ.जयंतराव पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत करून आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले. मात्र शंकरराव महापुरे,डॉ.विजय चांदणे यांनी प्रशासकीय मंजुरी आणि कामाची सुरुवात झाल्यावर आम्ही आंदोलन थांबवू. तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहील,हा पुतळा इथेच राहील,अशी भूमिका मांडली. त्यास आ. पाटील यांनी संमती दर्शविली. प्रा.शामराव पाटील,शहाजी पाटील,अरुण कांबळे, डॉ.सुभाषराव वायदंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

jayant-patil-news-rajarambapu-bank-to-erect-a-statue-of-annabhau-sathe-in-islampur

सुभाषराव सुर्यवंशी,अँड.धैर्यशिल पाटील, संदीप पाटील,शैलेश पाटील,बाळासाहेब पाटील (धनी),संजयकाका पाटील,शंकरराव पाटील,संजयधनी पाटील,विलास ताटे,अनिल पावणे,हिंदुराव माळी,दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर,समितीचे कबीर चव्हाण, अतुल चव्हाण,दिपक मिसाळ,रमेश सकटे, सागर चव्हाण,विजय लोंढे,संजय खवळे शिराळ्याचे लालासो तांबट,संदीप तडाखे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

इस्लामपूरकरांच्या मनातील मला कळते..

कार्यकर्त्यांनी चर्चेवेळी ही जागाही आमच्या डोळ्यासमोर होती असे सांगितले. त्यावेळी आ.पाटील यांनी हो, मला माहित आहे. तुम्ही या जागेतच पुतळा बसविणार होता. मात्र इकडे बसविला. इस्लामपूरकरांच्या मनात जे आहे, ते मला कळते असे म्हणताच सर्वांनी हास्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आ.पाटील यांचा मुख्याधिकार्‍यांना संपर्क..

नगरपालिकेचे मुख्याधिकारी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने आ.पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क केला. बँकेच्या वतीने आयर्लंडच्या जागेवर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्या संदर्भात पत्र देतील. आपण वरिष्ठांशी चर्चा करून मंजुरी द्यावी, पुतळ्याच्या कामास सुरुवात करता येईल असे त्यांना सांगितले. त्यावर सीओनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *