ravsaheb patil sangli news : सहकार शैक्षणिक अन् सामाजिक कार्याचा वसा ; रावसाहेब पाटील : रावसाहेब लक्ष्मीबाई जिनगोंडा पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे एक निःस्वार्थ सेवाभाव, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि समाजाच्या उत्कर्षासाठी जिवापाड झटणारा व्यक्तिमत्त्व, केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नव्हे, तर जैन समाजाच्या व्यापक हितासाठी, समाजातील नवतरुणांना अधिक संधी, सन्मान व दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. कार शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आढावा…
ravsaheb patil sangli news : सहकार शैक्षणिक अन् सामाजिक कार्याचा वसा ; रावसाहेब पाटील
औद्योगिक क्षेत्रातील योगदान
रावसाहेब पाटील हे सांगली येथील स्वदेशी औषध उद्योग समूहाचे संस्थापक असून, त्यांनी औषध व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वदेशी फार्मास्युटिकल्स ही आयएसओ 9001:2008 मानांकित कंपनी असून सुमारे 150 ब्रँड्सचे औषध वितरण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये केले जाते. डी. फार्मसी शिक्षण घेत असताना त्यांनी रिटेल मेडिकलपासून सुरुवात करून नियोजन, धाडस व दूरदृष्टीच्या बळावर औषध उत्पादनात मोठी भरारी घेतली.
सामाजिक कार्य
स्वदेशी ट्रस्टच्या माध्यमातून केमिस्ट गौरव पुरस्कार, मोफत औषधोपचार, व्यसनमुक्ती, रक्तदान शिबिरे यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक भान जपले आहे. ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालयाच्या स्थापनेसाठी भक्कम पाठबळ दिले. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी सदस्य म्हणून अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक. महाराष्ट्र जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सध्याचे सदस्य म्हणून कार्यरत. दक्षिण भारत जैन सभा या शिखर संस्थेचे माजी चेअरमन असून विद्यमान केंद्रीय उपाध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे भव्य शताब्दी अधिवेशन आयोजित करण्यात आले.
शैक्षणिक योगदान
डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी या नामांकित संस्थेचे संस्थापक चेअरमन, औषधशास्त्राच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एक भक्कम व्यासपीठ उभारले आहे. महावीर स्टेट अकॅडमी, इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेचेही ते संस्थापक चेअरमन आहेत. येथे ई-लर्निंगसारखी आधुनिक शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली या शहरातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत. या संस्थेच्या 34 शाखांमधून हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष – राज्यभरातील खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदान, धोरणात्मक निर्णय व समस्यांसंदर्भातील प्रश्नांवर सातत्याने सक्रियपणे कार्यरत. सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या हितासाठी ठोस भूमिका घेत त्यांच्या हक्कासाठी नेतृत्व करत आहेत.
सहकार क्षेत्रातील योगदान
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक आहेत. सुमारे 70 शाखा, शून्य छझअ, कोअर बँकिंग, डचड, टठ कोड अशा आधुनिक सुविधा. 2000 कोटींचा व्यवसाय आणि सातत्याने लाभांश देणारी एक विश्वासार्ह पतसंस्था आहे. सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ते संस्थापक संचालक आहेत
पुरस्कार व सन्मान
त्यांच्या कार्याची दखल विविध प्रतिष्ठित संस्थांनी घेतली आहे. उद्योग भूषण पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कार, सहकार श्री पुरस्कार.
औषध विक्रेते संघटनांतील कार्य
महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन-पश्चिम विभागाचे
माजी उपाध्यक्ष.सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष.
त्यांच्या कार्यकाळात…
जकात आंदोलन, व्हिजन 2020
मेळावा, सांगली केमिस्ट भवन यांसारख्या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











