kavtemankhal crime news : कवठेमहांकाळचा मंडल अधिकारी लाच घेताना जेरबंद

SHARE:

गुंठेवारी नियमितीकरण प्रस्ताव सादर करण्यासाठी मागितली लाच.

kavtemankhal crime news : कवठेमहांकाळचा मंडल अधिकारी लाच घेताना जेरबंद: कवठेमहांकाळ येथील खरेदी केलेल्या एका जुन्या गुंठेवारी जमिनीचे नियमितीकरण करण्यासाठी तहसीलदारांना प्रस्ताव सादर करण्यासाठी 25 हजारांची लाच घेणार्‍या मंडळ अधिकारी आणि कोतवाल या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत विभागाने आज सोमवारी दुपारी कवठेमहांकाळ येथील मंडळ कार्यालयात सदरची कारवाई केली.

kavtemankhal crime news : कवठेमहांकाळचा मंडल अधिकारी लाच घेताना जेरबंद

मंडळ अधिकारी मारुती विलास खोत (वय 48) आणि कोतवाल संजय किसन हारगे (वय 45, दोघे रा. विठूरायाचीवाडी) अशी लाचखोर दोघांची नावे आहेत. या दोघांविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या आईने तसेच त्यांच्या शेजारील इतर लोकांनी खरेदी केलेल्या जुन्या गुंठेवारी जमिनीचे नियमितीकरण करण्यासाठी कवठेमहांकाळ तहसीलदारांकडे अर्ज दिला होता. सदरच्या अर्जाची चौकशी, पंचनामा, जबाब नोंदवून, अभिप्राय देऊन तहसीलदारांना त्रुटींवर आलेल्या गुंठेवारी नियमितीकरण प्रस्ताव सादर करण्यासाठी मंडळ अधिकारी मारुती खोत आणि कोतवाल संजय हारगे यांनी एका प्रस्तावाचे सात हजार रुपये प्रमाणे पाच प्रस्तावाचे 35 हजार रुपये असा प्रोटोकॉल करावा लागेल असे सांगून 35 हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदारांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रारी अर्ज दिला होता. लाचलुचपतच्या पथकाने मंडळ अधिकारी कार्यालयात पडताळणी केली असता मंडळ अधिकारी खोत यांनी कामासंदर्भात कोतवाल हारगे यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे हारगे याना भेटले असता त्यांनी प्रस्ताव तहसीलदारांना पाठवण्यासाठी मंडळ अधिकारी आणि स्वतःसाठी 35 हजारांची मागणी करत तडजोडी नंतर 25 हजार रुपये देण्यास सांगितले.

यानंतर लागलीच लाचलुचपतच्या अधिकार्‍यांनी कार्यालयातच सापळा रचून 25 हजारांची लाच घेताना संजय हारगे यांना रंगेहात पकडले. यानंतर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.

सदरची कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण, कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, सीमा माने, वीणा जाधव यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *