namo yojna news : नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता शेतकर्‍यांच्र्‍या बँक खात्यात जमा

SHARE:

namo yojna news : नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता शेतकर्‍यांच्र्‍या बँक खात्यात जमा :  शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला. राज्यातील 91 लाख 65 हजार 156 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात एकूण 1892.61 कोटी रुपये निधी मंजुर निधी शेतक-यांच्या खात्यात वर्ग होईल.

namo yojna news : नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता शेतकर्‍यांच्र्‍या बँक खात्यात जमा

फडणवीसांच्याहस्ते वितरित राज्यातील 91 लाख 65 हजार 156 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात

मंत्रिमंडळ सभागृह, 7 वा मजला, मंत्रालय मुंबई येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंत्रीमंडळातील सदस्य,मुख्यसचिव राजेशकुमार यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये पात्र शेतकर्‍यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा उद्देश आहे. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतक-यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.

पात्र शेतक-यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतक-यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतक-यांना प्रति वर्षी बारा हजार अनुदान मिळत असते. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मना योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत.आतापर्यंत सहा हप्त्यामध्ये 93 लाख 9 हजार शेतक-यांना 11 हजार 130 कोटी रूपये थेट लाभ हस्तांतरणाव्दारे जमा करण्यात आला आहे.

namo-yojna-news-seventh-installment-of-namo-shetkari-yojana-deposited-in-farmers-bank-accounts

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना उत्पादन खर्च भागवता यावा आणि शेतीतून टिकाऊ व्हावी यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत असून या योजनेद्वारे शेतकर्‍यांना प्रतिवर्षी आर्थिक मदत देण्यात येते. आतापर्यंतच्या सहा हप्त्यांमधून राज्यातील लाखो शेतकर्‍यांच्या खात्यात थेट मदत रक्कम जमा झाली आहे. सातवा हप्ता वितरित झाल्यानंतर या लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *