yogewadi accident news : तासगावजवळ भीषण अपघात : योगेवाडीच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी : तालुक्यातील योगेवाडी गावच्या शिवारात मालवाहतूक करणारी पिकअप व चारचाकी गाडीचा रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. एका क्षणात दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.
yogewadi accident news : तासगावजवळ भीषण अपघात : योगेवाडीच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी
सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास जितेंद्र रमेश मोरे (रा. नराळे, ता. सांगोला) याने भरधाव वेगात व निष्काळजीपणे गाडी (क्र. चक-01 तA 9512) चुकीच्या दिशेने आणली. समोरून येणार्या जीतु महिंद्रा गाडीला (क्र. चक-12 ठछ 6903) जोरदार धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली.
या धडकेत सोपान मारुती सरगर (34) आणि नामदेव ज्ञानु सरगर (31, रा. कोळे, ता. सांगोला) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची बातमी कळताच गावात हळहळ व्यक्त झाली. घराचा कर्ता गमावला… दोन तरुणांचे आयुष्य क्षणात संपलं, अश्रुपूर्ण डोळ्यांनी नातेवाईकांचे दुःख ओसंडून वाहत होते.
अपघातात आरोपी जितेंद्र मोरे, रमेश लिंगाप्पा मोरे आणि रंजना रमेश मोरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी मृत तरुणांचा भाऊ नामदेव मारुती सरगर यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1), 125(अ), 125(ब), 281 व मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक घोरपडे या घटनेचा तपास करत आहेत. अपघातानंतर परिसरात हळहळ व संताप व्यक्त होत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











