jayant patil news : राजारामबापू कारखान्याकडून शेतकर्‍यांच्या खात्यावर दिवाळीसाठी 8 कोटी 37 लाख रूपये जमा

SHARE:

jayant patil news : राजारामबापू कारखान्याकडून शेतकर्‍यांच्या खात्यावर दिवाळीसाठी 8 कोटी 37 लाख रूपये जमा : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव-सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गळीत हंगाम सन 2024-25 मध्ये गाळपास आलेल्या ऊसा पोटी दिवाळी सणासाठी एकूण रुपये 8 कोटी 37 लाख ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी वर्ग केले आल्याची माहिती राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी दिली.

jayant patil news : राजारामबापू कारखान्याकडून शेतकर्‍यांच्या खात्यावर दिवाळीसाठी 8 कोटी 37 लाख रूपये जमा

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या साखर कारखान्या ने गळीत हंगाम 2024-25 मध्ये 13 लाख 72 हजार 281 मेट्रीक टन ऊसाचे गाळप केलेले आहे. यामध्ये साखराळे युनिटमध्ये 6 लाख 73 हजार 432,वाटेगांव-सुरूल युनिट मध्ये 3 लाख 98 लाख 593, कारंदवाडी युनिटमध्ये 3 लाख 255 मेट्रीक टन ऊसाचे गाळप केलेले आहे.

साखराळे,वाटेगाव-सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गाळपास आलेल्या ऊसास पहिला हप्ता प्रतिटन रुपये 3 हजार 200 प्रमाणे एकूण रक्कम रुपये 439 कोटी 12 लाख इतकी रक्कम ऊस बिलपोटी आदा केलेली आहे. सध्या दिवाळी सणासाठी 8 कोटी 37 लाख रुपये ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत.

कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव-सुरूल, कारंदवाडी व तिप्पेहळळी-जत युनिटमध्ये ऑफ सिझनची कामे गतीने सुरू आहेत. चारही युनिट शासनाने निश्चित केलेल्या तारखेस सुरू करीत आहोत. आपण गळीत हंगाम सन 2025-26 करिता साखराळे युनिटमध्ये 9 लाख 50 हजार,वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये 5 लाख 50 हजार,व कारंदवाडी युनिटमध्ये 4 लाख 50 हजार,तिप्पेहळळी-जत युनिटमध्ये 3 लाख 50 हजार असे एकूण 23 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. तरी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आपला सर्व ऊस आपल्या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे,असे आवाहन प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.

याप्रसंगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील,प्रदीपकुमार पाटील,कार्तिक पाटील,विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,चिफ अकौंटंट संतोष खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *