sanjaykaka news : कार्यकर्ता हाच माझा पक्ष: संजयकाका पाटील: सत्ता,पक्ष, पार्टी, पैसा याची मला अजिबात गरज नाही, आईच्या पोटातून जिगर घेऊन आलोय, पदासाठी कोणाच्याही दारात जाणार नाही. माझ्यासाठी माझा कार्यकर्ता हाच पक्ष असून विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवू या असे सांगत तुमच्यासाठी मी 24 तास उपलब्ध आहे. कामाला लागा असे आदेश माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तासगावात कार्यकर्त्यांना दिले. ते बुधवारी तासगावात जिल्हाभरातील कार्यकर्त्यांशी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बोलत होते.
sanjaykaka news : कार्यकर्ता हाच माझा पक्ष: संजयकाका पाटील
तासगावात कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले स्पष्ट, निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश
यावेळी बोलताना माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले कोणत्याही पक्षाचे उपकार मला नकोत. कोणतेही पद नसले तरी ‘संजयकाका बोलतोय’ म्हटलं की अधिकारी काम टाळत नाहीत, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना उत्साह दिला. की मी संघर्ष करणारा माणूस असून सत्तेत असतानाही काही गोष्टीं मला पटल्या नाहीत. मात्र चांगल्या कामासाठी मी समंजसपणाने वागलो, कार्यकर्ता हेच माझे बळ असून तुमच्या बळावरच हा संजय पाटील आज पर्यंत उभा आहे. मात्र सत्ता जरी गेली तरी फोनवर मी संजयकाका बोलतोय हे सांगितल्यावर अधिकारी चुकीचे काम करत नाहीत. संघर्षाच्या काळात अनेकांशी दोन हात केले.
विरोधकांचे हजाराचे लीड पाच हजारावर आणल्याचे सांगत त्यांनी जुन्या संघर्षाचा दाखला दिला. खासदार म्हणून जिल्हाभरात अनेक ठिकाणी काम केले मात्र कधी त्या कामाची मी जाहिरातबाजी केली नाही. आपल्या भाषणात संजय काका पाटील यांनी जाती-जातीत तेढ वाढवणे व हिंदू मुस्लिम दंगलीचा दाखला देत जातीपातीत भेद करणे योग्य नसल्याचे सांगत मिरज दंगल शांत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याच्या अडचणी असल्यामुळे मध्यंतरीचा काळ मला कठीण गेला.
मात्र सत्ता काळात कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने सांगावं मला पैसे दिले. राजकारणात राहून मी राजकारणाचा धंदा केला नाही. कार्यकर्तेच माझा पक्ष असून तुमच्यासाठी मी दिवस रात्र एक करेन. निवडणुका तोंडावर आहेत तयारीला लागा मी आहे. असे आदेश त्यांनी यावे दिले.
या मेळाव्यात युवा नेते प्रभाकर पाटील म्हणाले, आजच्या मेळाव्याचा अंदाजच चुकला. अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकर्ते आले – हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. संजयकाकांनी कधीही कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेतले नाहीत. संघर्ष येईल, पण घाबरायचं नाही. युवकांचे संघटन आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आपण ताकदीने पुढे जाणार आहोत.
sanjaykaka-news-workers-are-my-party-sanjaykaka-patil
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉ. प्रताप पाटील यांनी संजयकाकांबद्दल आत्मीयता व्यक्त केली. काकांवर असलेल्या प्रेमापोटीच मी इथे आलोय. काकांपेक्षा जास्त पराभव मी पचवले आहेत. 2004 साली मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला, पण पराभूत झालो. आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर संघर्ष नको असं काकांनी सांगितलं, पण आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. काकांना वाटेल ती मदत करण्यास मी सदैव तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











