panchyat samiti news : वाळवा, कडेगाव, आटपाडीचे सभापतीपद खुले : जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या सभापती सोडतीत वाळवा, आटपाडी, आणि कडेगाव पंचायत समितीचे सभापतीपद खुले झाले. तर कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्याचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. पलूस व शिराळा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर खानापूर-विटा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि मिरज पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गसाठी राखीव ठेवण्यात आले. सहा सभापती पदे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे चुरस निर्माण होईल. सभापतीपद खुले असलेल्या तालुक्यात इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान सोमवारी गट आणि गणांच्या आरक्षणानंतर राजकीय चित्र स्पष्ट होईल.
panchyat samiti news : वाळवा, कडेगाव, आटपाडीचे सभापतीपद खुले
तासगाव, कवठेमहांकाळ, जत सर्वसाधारण महिला तर मिरज पं.स. सभापतीपद अनु. जातीसाठी आरक्षित
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आरक्षण सोडतीवेळी सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यांची लोकसंख्या विचारात घेऊन, रोटेशननुसार उतरत्या टक्केवारीनुसार आरक्षण काढण्यात आले. आरक्षण काढताना 1997 पासूनचे आरक्षणाचा विचार करण्यात आला. त्यामुळे मिरज पंचायत समितीचे सभापतीपद थेट अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले.
1997 पासूनचा आरक्षण विरारात घेऊन शिराळा आणि पलूस पंचायत समितीचे सभापदीपद सुद्धा थेट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले. त्यानंतर जत आणि खानापूर-विटा तालुक्यामध्ये चिठ्या टाकण्यात आले. ईश्वरी सुलाने या विद्यार्थ्यानीच्या हस्ते चिठ्ठी काढली. त्यामध्ये खानापूर-विटा पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागार्स प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाले.
आटपाडी, वाळवा, कडेगाव, कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्याचे सभापतीपद सर्वसाधारण म्हणून निश्चित झाले. त्यानंतर 1997 पासून पडलेल्या आरक्षण आणि रोटेशनचा विचार करून कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत पंचायत समितीचे सभापतीपद खुला प्रवर्ग महिलेसाठी राखीव करण्यात आले. त्यामुळे या तालुक्यात महिलांसाठी दारे खुली झाली आहेत. त्यामुळे गावोगावी स्थानिक महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आटपाडी, वाळवा, कडेगाव तालुक्याचे सभापतीपद खुले झाल्याने चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा परिषदेच्या 61 गटाचे आणि पंचायत समितीच्या 122 गणाचे सोमवारी (दि. 12) रोजी सोडत काढण्यात येणार आहे. गट आणि गणांच्या आरक्षणानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
तालुका सभापती आरक्षण
वाळवा सर्वसाधारण
आटपाडी सर्वसाधारण
कडेगाव सर्वसाधारण
तासगाव सर्वसाधारण महिला
कवठेमहांकाळ सर्वसाधारण महिला
जत सर्वसाधारण महिला
पलूस नामाप्र
शिराळा नामाप्र
खानापूर-विटा नामाप्र (महिला)
मिरज अनु जाती (महिला)
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











