sangli crimr news : एक कोटीच्या बनावट नोटा जप्त: मिरजेत संशयितरित्या फिरत असलेल्या व्यक्तिकडे बनावट नोटा सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून मिरज, कोल्हापूर येथून बनावट नोटा तयार करणार्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 1 कोटी रूपयाच्या बनावट नोटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. कोल्हापुरातील एक पोलीस या टोळीचा मास्टरमाईंड असल्याचे पुढे आले आहे.
sangli crimr news : एक कोटीच्या बनावट नोटा जप्त
मिरज, कोल्हापुरातून पाच जण ताब्यात : कोल्हापूरचा पोलीस रॅकेटचा मास्टरमाईंड
मिरज गांधी चौकी पोलिसांना मिरजेतील निलजी-बामणी रोडवरील पुलाखाली एक इसम संशयरीतरित्या घुटमळत थांबलेला असल्यााची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले सुप्रीत काडाप्पा देसाई असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात भारतीय 500 मुल्याच्या चलनी नोटासारख्या हुबेहुब दिसणार्या 42 हजार रूपये किंमतीच्या 84 बनावटा नोटा मिळून आल्या. याला अटक त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.
देसाई याची या नोटा कोणी दिले अशी माहिती विचारली असता त्याने राहुल राजाराम जाधव (वय 33 रा. लोकमान्य नगर, कोरोची ता. हातगणंगले), इब्रार आदम इनामदार (वय 44 रा. विश्वकर्मा अपार्टमेट, कसबा बावडा कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय 40 रा.वनश्री अपार्टमेट, टाकळा, राजारामपुरी कोल्हापूर), सिध्देश जगदीश म्हात्रे (वय 38 रा. रिध्द गार्डन, ए. के. वैद्य मार्ग मालाड पूर्व मुंबई) यांची नावे निष्पन्न झाली असून, या सर्वांकडून 1 कोटी 11 लाख 6 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल गांधी चौकी पोलिसांनी जप्त केला आहे.
तिघांना 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. बनावट नोटा बनावण्यामध्ये कोल्हापूर येथील पोलिस दलातील परिवहन विभागात कार्यरत असलेला इब्रार आदम इनामदार या हेडकॉन्टेबलचा सहभाग आहे.
आरोपी राहुल जाधव याला कोल्हापूर शहरातील मुख्य मार्केट परिसरातील रूईकर कॉलनी येथील बनावट नोटा तयार करण्याच्या ऑफीसमधून ताब्यात घेतले. ऑफीसची तपासणी करता 500 रूपये मुल्याच्या चलनी नोटासारख्या हुबेहुब दिसणार्या 34 हजार रूपये किंमतीच्या 68 बनावट नोटा व सदर बनावट नोटांची छपाई करण्यासाठी वापरण्यात येणारे 1 लाख 7 हजार 600 रूपये किंमतीचे लॅपटॉप, प्रिंटर व इतर साहित्य मिळून आले. तर इब्रार आदम इनामदार व नरेंद्र शिंदे तसेच त्यांचा मित्र सिध्दे म्हात्रे यांना पुणे-बेंगलोर हायवेवरील पेठनाका ते कासेगाव दरम्यान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विना नंबर प्लेट टोयोटा इनोव्हा ही चारचाकी वाहन 500 च्या हुबेहुब दिसणार्या बनावट मिळून आल्या.
राहुल जाधव हा सराईत गुन्हेगार असून परराज्यात व इतर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तर इब्रार इनामदार हा हेडकॉन्टेबल आहे. वरील सर्वांकडून 98 लाख 43 हजार 500 मुल्याच्या भारतीय 500 रूपये दराच्या चलनी नोटासारख्या हुबेहुब दिसणार्या एकूण 19 हजार 687 बनाव नोटा, 85 हजार 800 रूपये मुल्याच्या भारतीय 200 रूपये दराच्या चलनी नोटारसारख्या हुबेहुब दिसणार्या एकूण 429 नोटा, 1 लाख 77 हजार 600 रूपये किंमतीचे बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले लॅपटॉप, प्रिंटर व इतर साहित्य ,10 लाख रूपये किंमतीची विना नंबरप्लेटची टोयोटा इनोव्हा चारचाकी गाडी असा एकूण 1 कोटी 11 लाख 6 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल गांधी चौकी पोलिसांनी जप्त केला आहे.
sangli-crimr-news-fake-notes-worth-one-crore-seized
यावेळी श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक, सांगली, प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज,पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, श्रीमती पुनम पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, पोलीस नाईक राहुल क्षीरसागर, नानासाहेच चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, राजेंद्र हारमे, अमोल तोडकर, विनोद चव्हाण, पोलीस हेडकॉनटेवाल विनायक झांबरे, संतोष हामसे, पोलीस कॉन्स्टेबल महेश गुरव, संदिप घोडे, विकास कांवळे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, चालक पोलीस हेडकॉन्स्टेचल निवारा माने, सुधीर खाडे यांनी सहभाग घेतला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











