संजय पवार, भोसे
bhose zp news : नेतृत्व करणार्या भोसे मतदार संघातून अनेकजण इच्छुक : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखणारा आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दोन वेळा बहुमान मिळविलेला भोसे जिल्हा परिषद मतदार संघ सर्वसाधारण गटासाठी खुला झाला आहे. त्यामुळे विविध पक्ष आणि संघटनांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. सध्यस्थितीला डझनाहून अधिक जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. शिवाय जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महिलांना संधी देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.
bhose zp news : नेतृत्व करणार्या भोसे मतदार संघातून अनेकजण इच्छुक
भोसे जिल्हा परिषद गटामध्ये भोसे आणि सोनी या दोन पंचायत समितींचा समावेश आहे. भोसे पंचायत समिती सर्वसाधारण गटासाठी खुला आहे तर सोनी पंचायत समिती गण राखीव झाला आहे. भोसे जिल्हा परिषद गटाची 33 हजार 223 इतकी लोकसंख्या आहे. या गटात 11 गावांचा समावेश होतो. भोेसे गणात भोसेसह सिध्देवाडी, कळंबी, तानंग या गावांचा तर सोनी गणात सोनीसह पाटगाव, कांचनपूर, काकडवाडी, सांबरवाडी, करोली आदी गावांचा समावेश आहे.
यापूर्वी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करणार्या सौ. नंदाताई खोत आणि सौ. कांचन पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. तर राजेंद्र पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद भूषविले आहे. तर भोसे गणाचे नेतृत्व करणारे सुभाष पाटील आणि सौ. सुवर्णा चौगुले यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले आहे. हा मतदार संघ नेतृत्व करणारा ठरला असल्याने या मतदार संघातून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदार संघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
भोसे मतदार संघातून सध्यस्थितीला भोसेचे माजी उपसरपंच दादासो चौगुले हे इच्छुक आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि खासदार विशाल पाटील गटाचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या दोन वर्षापासून त्यांनी या मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावातील विकास सोसायट्या, ग्रामपंचायत, सहकारी पतसंस्थांची त्यांचा घनिष्ठचा संबंध आहे. सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांनी ओळखले जाते. याशिवाय करोलीचे उद्योजक विजय भगत हे सुध्दा इच्छुक आहेत. खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या व्यवसायासह या मतदार संघातील सामाकि आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य चांगले असल्याने त्यांच्याही नावाची चांगलीच चर्चा आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, सोनीचे माजी सरपंच दिनकर पाटील यांनीही दोन वर्षापासून या मतदार संघात मोर्चेबांधणी केली आहे. या मतदार संघात त्यांचे चांगले प्राबल्य आहे. गणेशोत्सव आणि सामाजिक कार्यातून तरूणांची चांगली फळी त्यांनी उभी केली आहे. मतदार संघातील सर्वच गावात त्यांचे चांगलेच राजकीय वजन आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरूवात केली आहे.
पंचायत समितीचे माजी सदस्य आणि व्यावसायिक कांचनपूरचे अरूण पाटील हेही भाजपाकडून इच्छुक आहेत. आमदार सुरेश खाडे आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, भव्य बैलगाडी शर्यती, वारकरी सांप्रदाय, आदीसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे त्यांच्या पाठीशी युवकांची मोठी ताकत आहे. आपल्य कार्यकाळात पंचायत समितीच्या माध्यमातून लाखोंची कामे त्यांनी राबविली आहेत.
bhose-zp-news-many-are-interested-from-the-leading-bhose-constituency
याशिवात तानंगचे आशिष जाधव हेही भाजपकडून इच्छुक आहेत. व्यावसायिक असलेल्या जाधव यांनी पैठणीची साडी या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगली राजकीय पेरणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. याशिवाय मराठा आंदोलक पाटगावचे अशोक शिंदे, कळंबीचे माजी सभापती सुभाष पाटील, सिध्देवाडीचे आप्पासाहेब शिंदे, भोसे पूर्वभाग विकास सोसायटीचे संचालक उमेश पाटील, शितल पाटील आदीही इच्छुक आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











